शरद पवारांनी काढली 'महाशिवआघाडी'ची हवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2019
Total Views |



नवी दिल्ली : राज्यात सरकार स्थापनेबद्दल शिवसेनेसोबत एकत्र येऊन राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सोबत सरकारस्थापनेबद्दलची शक्यता फेटाळून लावत महाशिवआघाडीच्या फूग्यातील हवा शरद पवार यांनी काढून घेतली आहे. यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्या सत्तास्थापनेबद्दलच्या शक्यतेला आणि प्रस्तावित महाशिवआघाडीला सुरूंग लावण्याचा प्रयत्न पवारांनी केला आहे.

 

शिवसेनेसोबत जाण्याचा आमचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे पवारांनी म्हटले. शिवसेना, भाजप निवडणूकीत एकत्र लढले. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि आमचे मित्र पक्ष आम्ही एकत्र लढलो आहोत, त्यामुळे त्यांच्या मतांचा आम्हाला आदर करावा लागेल, राज्यातील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही ते म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलेल्या १७० या आमदारांच्या संख्याबळाबद्दल त्यांच्या विचारले असता हा प्रश्न शिवसेनेला आणि राऊतांना विचारा असा टोलाही त्यांनी लगावला.

@@AUTHORINFO_V1@@