राऊत नरमले! म्हणे शेती प्रश्नांवर पवारांशी चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोमवारी सुटण्याची शक्यता होती मात्र, आता राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच महाशिवआघाडीतील हवा काढून घेत असा कुठलाच प्रस्ताव झाल्याची प्रतिक्रीया दिली. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवारांची दिल्लीत भेट घेतली मात्र, वेळोवेळी आघाडीसोबत सत्तास्थापनेचा दावा करणारे राऊत मात्र, नरमलेले दिसले. 'राज्यातील अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पवार यांच्याशी भेट झाली', असे राऊत म्हणाले.



 

राऊत म्हणाले, "शरद पवार हे देशाचे माजी कृषीमंत्री आहेत. यामुळे राज्यातील अवकाळी पावसाबद्दल शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करण्याचे आवाहन पवार यांना केले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना मदत लवकर मिळावी यासाठी मदत मागण्याचे आवाहन करणार आहे."

 

सत्तास्थापनेचा दावा करणारे संजय राऊत सोमवारी पवारांच्या झालेल्या बैठकीनंतर आघाडीशी सत्तास्थापनेबद्दल काही बोलले नाहीत, मात्र, राज्यात शिवसेनेच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होईल, असा दावा करण्यास नेहमीप्रमाणे ते विसरले नाहीत. दरम्यान, पवारांच्या भूमिकेमुळे राऊत यांनी पुन्हा आघाडीची मनधरणी करण्यासाठी पुन्हा प्रयत्न केल्याची चर्चा सध्या दिल्लीतील राजकीय वर्तूळात आहे.





@@AUTHORINFO_V1@@