दहावी, बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2019
Total Views |



मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चं माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थी आणि पालक परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्यी अधिकृत वेबसाइट http://www.mahahsscboard.in/ यावर जाऊन पाहू शकता.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणारी १२ची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून तर इयत्ता १०ची परीक्षा ३ मार्चपासून सुरू होणार आहे. संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थाळावर दिनांक १५/१०/२०१९ पासून उपलब्ध करून देण्यात आले होते. या वेळापत्रकाबाबत काही सुचना असल्यास मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरुपात मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार संघटना, पालक, शिक्षक यांच्याकडून प्राप्त झालेल्या सुचनांचे अवलोकन करुन १२ वी आणि १० वीचे संभाव्य वेळापत्रक अंतिम करण्यात आले आहे.

 

चुकीच्या वेळापत्रकांपासून सावधानतेचा इशारा

 

परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळाने छापील स्वरुपात दिलेली वेळापत्रकेच अंतिम असतील. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य संकेतस्थळांवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले, तसेच व्हॉट्सअॅपवर किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरले जाऊ नये असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@