टिकटॉकमुळे मुलांवर वाईट परिणाम ; याचिका दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2019
Total Views |



मुंबई : 'टिकटॉक' या मोबाईल अॅपविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हिना दरवेश या मुंबईतील गृहिणीने टिकटॉकवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. 'टिकटॉक'मुळे मुलांच्या मनावर परिणाम होत असून यामुळे अनेक पालकांमध्ये चिंतेचे वाटेवर पसरले आहे. याआधीही मद्रास उच्च न्यायालयात टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी करण्यात अली होती.

 

'टिकटॉकमुळे मुलांवर वाईट संस्कार होतात. यामुळे देशात जातीयवाद निर्माण होऊ शकते. तसेच, या अॅपमुळे देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन होत आहे.' असे आरोप हिना दरवेशी यांनी याचिकेत केले आहेत. लवकरच या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने टिकटॉकवर बंदी घालण्यास मज्जाव केला होता. परंतु, त्यानंतर या अॅपवरून वादग्रस्त व्हिडियो काढून टाकण्यात आल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालय यावर काय निर्णय घेते याकडे सर्वच पालकांचे लक्ष लागले आहे.

@@AUTHORINFO_V1@@