खासदार नुसरत जहॉं रुग्णालयात दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2019
Total Views |



 

कोलकाता : तृणमुल कॉंग्रेस खासदार नुसरत जहॉं यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोलकाता येथील अपोलो रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले. नुसरत यांचे प्रवक्ता अभिषेक मजूमदार यांनी ही माहिती दिली आहे. 'याच कारणासाठी त्या आजपासून सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनालाही उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात येणार आहे.', अशी माहिती त्यांनी दिली.

 

नुसरत जहॉं यांची रविवारी अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अतिप्रमाणात औषधांचे सेवन केल्याने त्यांना हा त्रास झाला. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. नुसरत जहॉं यांना अस्थम्याचा त्रास आहे. त्यांच्या नातेवाईकांनी त्या लवकरच बऱ्या होतील, असे सांगितले आहे. नूसरत जहॉं बंगाली सिनेमातील प्रसिद्ध नायिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी पश्चिम बंगालच्या बशीहाट येथून तृणमुल कॉंग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर निखिल जैन यांच्यासह त्यांनी तुर्कीतील शहर बोडरम येथे विवाह केला होता.

@@AUTHORINFO_V1@@