माझ्या जिलेबी न खाण्याने प्रदुषण थांबेल तर मी खाणे सोडून देईन : गौतम गंभीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2019
Total Views |


नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनी ट्रोलर्सला आपल्या खास शैलीत उत्तर दिले. "मी जिलेबी खाणे सोडून दिले तर प्रदूषण कमी होईल का ?,", असा प्रतिप्रश्न त्यांनी टीकाकारांना केला आहे. गौतम गंभीर, माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस.लक्ष्मण आणि समालोचक जतीन सप्रू यांचा जिलेबी खातानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान, या प्रकरणी प्रश्न विचारला असता गंभीर यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.

 

यावेळी बोलताना गंभीर यांनी सांगितले की, "प्रदुषणासंदर्भात मला काळजी वाटत नाही, असे तुमचे म्हणणे आहे का ?, माझी पाच वर्षांची मुलगीही याच दिल्लीत राहते, अनेक कुटूंबातील लहान मुले आज दिल्लीतील प्रदूषणामुळे त्रस्त आहेत. माझ्यावर प्रश्न विचारणाऱ्यांनी त्यांनी पाच वर्षांत प्रदूषण नियंत्रणासाठी काय केलं ते आधी सांगावं"

@@AUTHORINFO_V1@@