हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांची पर्यावरण जागृती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2019
Total Views |



नवी दिल्ली : सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी अनेक विषयावर चर्चा आणि वादविवाद रंगण्याची शक्यता आहे. या वर्षातले हे शेवटचे अधिवेशन आहे. अधिवेशनाचा पहिल्या दिवशी सकाळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रदूषणमुक्तीचा संदेश देत इलेक्ट्रिक कारमधून संसदेच्या परिसरात प्रवेश केला. तसेच, भाजपचे खासदार आणि दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी आणि गुजरातचे भाजपचे खासदार मनसुख मांडवीया हे सायकलवरून लोकसभेच्या आवारामध्ये दाखल झाले.

 

"इलेक्ट्रिक कारमुळे प्रदूषण होत नाही. त्यामुळे सरकारचा हळूहळू इलेकट्रीक कारचा वापर वाढण्यावर भर देण्यात येणार आहे. जनतेने जास्तीत जास्त सरकारी वाहने आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून प्रदूषण विरोधी लढ्यात योगदान द्यावे." असे आवाहन जावडेकरांनी केले. बदललेले तापमान आणि विविध बाबींमुळे वाढणारे प्रदूषण हा सर्व भारतीयांच्या चिंतेचा विषय बनला आहे. प्रदूषण नियंत्रणात येण्यासाठी भारत सरकार योग्य त्या उपाययोजना करत आहे. अशामध्ये नेत्यांनी केलेल्या या पर्यावरण जागृतीचे जनसामान्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.

@@AUTHORINFO_V1@@