२०२२मध्ये महापौर आमचाच : आशिष शेलार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2019
Total Views |


 


मुंबई : मुंबई महापौरपदाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. 'तुल्यबळ आहोत, परंतु संख्याबळ नाही. महापौपदासाठी सन २०२२ लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यावेळी स्वबळावर महापौर निवडून आणण्याची भाजप तयारी करणार आहे.' असे ट्विट भाजपचे नेते आशीष शेलार यांनी केले. तसेच ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी त्याला दुजोरा दिला आहे.

 

सध्या राज्यामध्ये भाजपकडे संख्याबळ असूनही शिवसेनेमुळे ते सत्तेपासून दूर असल्याचे चित्र आहे. मित्रपक्ष शिवसेना आघाडीसोबत युती करून सत्तेवर येणार असल्याची खलबतं राज्यभरात सुरू आहेत. अशातच शेलार यांनी मुंबई महापालिकेत स्वबळावर सत्ता आणून भाजपचा महापौर बसवणार असल्याचे ट्वीट करून शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे नाव महापौरपदासाठी घेतले जात असले तरी त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. मातोश्रीवर त्याबाबत बैठक चालू आहे. रविवारी काँग्रेसच्या मुंबई प्रदेशच्या बैठकीत तूर्तास कोणालाही समर्थन न देण्याचा निर्णय घेतला आहे.

@@AUTHORINFO_V1@@