
'दोस्ताना २'मध्ये नुकतीच एका नवीन कलाकाराची एंट्री झाली आहे. 'स्त्री' चित्रपटात राजकुमार रावसोबत झळकलेला अभिनेता अभिषेक बॅनर्जी, जान्हवी कपूर आणि कार्तिक आर्यनसोबत 'दोस्ताना २'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'दोस्ताना माझा आवडता चित्रपट आहे. त्यामुळे 'दोस्ताना २' चित्रपटाचा एक भाग बनणं माझ्यासाठी खूप खास आहे. कॉलिनला मी आधीपासून ओळखतो, सिक्रेट सुपर स्टारच्या वेळी मी कास्टिंग डिरेक्टर म्हणून त्याच्या सोबत कामही केलं आहे. कार्तिकलाही मी ओळखत असल्याने त्यांच्यासोबत काम करताना मजा येणार आहे.' असं अभिषेक या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाला. अभिषेक सध्या आयुष्मानच्या 'बाला' चित्रपटातही दिसला होता.
New mug ✌😉@karanjohar @TheAaryanKartik @janhvikapoorr @itsLakshya1 @DharmaMovies #newlife #actor #actorslife #playtime pic.twitter.com/kHgczcWuLG
दोस्ताना २ हा २००८ मध्ये आलेल्या 'दोस्ताना' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाची कथा दोन तरुणांच्या आयुष्याभोवती फिरते. हे तरुण राहायला जागा मिळावी म्हणून 'समलैंगिक' असल्याचं नाटक करतात आणि नंतर दोघेही एकाच मुलीच्या प्रेमात पडतात. तेव्हा आता यांच्या आयुष्यात नेमकं काय घडणार हे पाहणं नक्कीच मजेशीर असणार आहे.