अयोद्ध्या खटल्याचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना 'झेड' सुरक्षा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2019
Total Views |


नवी दिल्ली : केंद्र सरकारने न्यायाधीश एस. अब्दुल नाझीर आणि त्यांच्या कुटूंबियांना 'झेड' श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गृहमंत्रालयाला दिली आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. गृहमंत्रालयाने सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीसांना या संबंधिचे निर्देश दिले आहेत. एस. अब्दुल नाझीर हे अयोद्ध्या खटल्यावर निर्णय देणाऱ्या खंडपीठातील पाच न्यायाधीशांपैकी एक आहेत. सरकारने यापूर्वी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना 'झेड प्लस' सुरक्षा दिली होती.

 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक पोलीस आणि सीआरपीएफतर्फे त्यांना तत्काळ सुरक्षा प्रदान करण्यात येणार आहे. न्यायमूर्ती बंगळूरु किंवा मंगळूरु आदी ठिकाणी प्रवास करतील. त्यावेळी त्यांना सोबत ही सुरक्षा घेऊन जावे लागेल, ही सुरक्षा त्यांच्या कुटूंबियांनाही देण्यात येणार आहे. झेड सुरक्षा श्रेणीत निमलष्करी जवान आणि पोलीसांचे एकूण २२ जवान तैनात असतात.




@@AUTHORINFO_V1@@