शिवसेनेची 'एनडीए'मधून 'एग्झिट' : भाजपची घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : भाजप-शिवसेना युती आता अधिकृतरीत्या संपुष्टात आली आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, "शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीला येत नाही. शिवसेनेचे एकमेव केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला. ते कॉंग्रेससह काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, साहजिकच त्यांनी विरोधकांच्या बाकावर बसण्याचे निवडले आहे आणि आम्ही त्यास सहमती दिली आहे. लोकसभा आणि राज्यसभेत शिवसेना विरोधी बाकावर बसेल."

 

विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत असताना मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षात वादंग निर्माण झाला आणि याचाच फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतला. त्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांचे एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्यानंतर अखेर रविवारी दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत शिवसेना न आल्याने भाजपने अधिकृतरित्या शिवसेना एनडीएतून बाहेर गेल्याचे जाहीर केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@