लोकसभेत शिवसेना खासदार पहिल्या रांगेतून थेट तिसऱ्या रांगेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2019
Total Views |
 


नवी दिल्ली : राज्यातील सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसशी जुळवाजूळव करणारी शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्याची आज अखेर घोषणा करण्यात आली. शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्रीमंडळातील नेते अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला. त्यामुळे त्यांची रवानगी आता लोकसभेत पहिल्या रांगेतून आता थेट तिसऱ्या रांगेत होणार आहे. अरविंद सावंत यांच्या मंत्रीमंडळाचा कारभार आता प्रकाश जावडेकर यांना देण्यात आला आहे.

 

सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यापूर्वी एनडीएची बैठक पार पडली आहे. गेल्या ३० वर्षांत पहिल्यांदाच शिवसेनेला निमंत्रण गेले नाही. मात्र, शिवसेनेची राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या विरोधी बाकांवरच्या पक्षांशी सलगीचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. सत्ताधारी बाकांवरून आता शिवसेना विरोधी बाकांवर बसणार आहे. त्यामुळे शिवसेना खासदारांना आता थेट तिसऱ्या रांगेत बसावे लागणार आहे.




@@AUTHORINFO_V1@@