अयोद्ध्या प्रकरणी पूर्नविचार याचिका दाखल होणार ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2019
Total Views |


'ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड'च्या बैठकीत निर्णय




लखनऊ : अयोद्ध्या प्रकरणी रामलल्लाच्या बाजूने निर्णय आल्यानंतर आता 'ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड'तर्फे रविवारी बैठक घेण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पूर्नविचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मशिदीसाठी देण्यात इतर ठिकाणी येणारी जागा आम्हाला मान्य नाही, अशी भूमिकाही यावेळी घेण्यात आली.

यापूर्वी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाची बैठक लखनऊतील मुमताज पीजी महाविद्यालयात घेण्यात आली. या बैठकीत बोर्डाचे अध्यक्ष राबे हसन नदवी यांच्यासह असदुद्दीन ओवैसी आणि जफरयाब जिलानीही हजर होते. बैठकीत अयोद्धा राम जन्मभूमी प्रकरणी पूर्नविचार याचिका दाखल केली करण्यात यावी, तसेच मशीदीसाठी देण्यात येणारी पाच एकर जमीन स्वीकारावी का याबद्दल मंथन करण्यात आले.

 

ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या बैठकीत जामीयत-ए-हिंद मौलाना अरशद मदनी म्हणाले कि, 'अयोद्ध्या प्रकरणी पूर्नविचार याचिका फेटाळून लावण्याची शक्यता शंभर टक्के आहे याची कल्पना आम्हाला आहे. मात्र, याचिका दाखल करणे हा आमचा अधिकार आहे.'

 

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाची ही बैठक लखनऊतील नवदा महाविद्यालयात प्रस्तावित होती. मात्र, अचानक यात बदल करून मुमताज पीजी महाविद्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला मौलाना महमूद मदनी, अरशद मदनी, मौलाना जलाउद्दीन उमरी, मुस्लिम लीगचे खासदार बशीर, खालिद रशीद फिरंगी महली, असदुद्दीन ओवैसी, जफरयाब जिलानी, मौलाना रहमानी, वली रहमानी, खालिद सैफुला रहमानी आणि राबे हसन नदवी आदी हजर होते.






 

@@AUTHORINFO_V1@@