पुन्हा एकदा सैनिकांच्या ताफ्यावर हल्ला ; १ जवान शहीद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2019
Total Views |


 


जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांच्या कारस्थानांनी पुन्हा एकदा मान वर केली आहे. त्यांनी पुन्हा एकदा भारतीय सैनिकांना टार्गेट केले आहे. दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये आयईडी ब्लास्ट केला ज्यामध्ये २ जवान जखमी झाले असून एक जवान शहीद झाल्याचे सांगण्यात आले. या ब्लास्टची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही.

 

काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये ही घटना घडली. जवानांची एक तुकडी लष्कराच्या ट्रकमधून प्रवास करीत असताना हा स्फोट झाला. या भीषण स्फोटात तीन जवान गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारांदरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला.

 
@@AUTHORINFO_V1@@