राजस्थानातील संस्कृत शाळेत ८० टक्के मुस्लीम विद्यार्थी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2019
Total Views |




जयपूर : राजस्थानातील ठाकूर हरिसिंह शेखावत मंडावा प्रवेशिका संस्कृत विद्यालयात ८० टक्के मुले मुस्लीम असून, ते संस्कृत भाषेचा कसून अभ्यास करत आहेत. याशिवाय त्यांना तब्बल चार भाषा अवगत असल्याचे सांगण्यात येत आहे. या संस्कृत विद्यालयात शिकणार्या एकूण २७७ विद्यार्थ्यांपैकी २२२ विद्यार्थी मुस्लीम आहेत.

 

विद्यालयात पद्मासनात बसलेल्या अवस्थेत संस्कृत श्लोकांचे पठण करणार्या विद्यार्थ्यांना पाहून ते प्राचीन गुरुकुल असल्याचा भास होतो. ठाकूर हरिसिंह शेखावत विद्यालयात हिंदूंपेक्षा मुस्लीम विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. हे प्रमाण २२२ म्हणजेच सुमारे ८० टक्के आहे, हे विशेष. ते सर्वजण संस्कृत भाषेचा अभ्यास करत असून, संस्कृत हा केवळ अभ्यासाचा विषय नव्हे तर जीवन जगण्याचा एक भाग झाला आहे. विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी करिअरसाठी पर्याय म्हणून संस्कृतची निवड केली असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@