बांग्लादेशला टीम इंडियाचा धोबीपछाड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2019
Total Views |


 


इंदोर : भारत आणि बांग्लादेशच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १ डाव आणि १३० धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. तसेच, बांग्लादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने १-० अशी आघाडी मिळवली आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्यास आलेल्या बांग्लादेश संघाचा पहिला डाव अवघ्या १५० धावांवर आटोपला. त्यानंतर मयांक अगरवालने केलेल्या द्विशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावामध्ये ६ बाद ४९३ अशी धावसंख्या उभारली होती. त्यानंतरच्या डावामध्ये बांग्लादेशला चांगली फलंदाजी करता आली नाही आणि भारतीय गोलंदाजांसमोर अखेर त्यांनी गुडघे टेकले. 

 

बांग्लादेशने पहिले नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलटी आला. बांगलादेशचा संपूर्ण संघ फक्त १५० धावा करून तंबूत परतला. यावेळी भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर, इशांत शर्मा, उमेश यादव आणि आर. अश्विनने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी करत पहिल्या डावामध्ये ६ बाद ४९३वर डाव घोषित केला.

 

बांग्लादेशला ३४३ धावांची आघाडी मिळवली. परंतु, दुसऱ्या डावामध्येसुद्धा बांग्लादेशी फलंदाजांनी घसरगुंडी सुरूच राहिली. सुरुवातीला झटपट ४ विकेट काढत भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर आपली पकड मजबूत केली. मुशफिकर रहीमचे ६४ धावा वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. पुन्हा एकदा शमीने या डावामध्ये ४ विकेट घेतले. तसेच, अश्विनच्या फिरकीसमोर ३ फलंदाजांनी गुडघे टेकले. उमेश यादवने २ तर इशांत शर्माने १ विरक्त घेतली.

 
@@AUTHORINFO_V1@@