वात्सल्य ट्रस्टचे संस्थापक गजानन दामले यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2019
Total Views |



मुंबई : मुंबई येथील 'वात्सल्य ट्रस्ट'चे संस्थापक सदस्य गजानन अनंत दामले यांचे शुक्रवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. मृत्यूसमयी ते संस्थेच्या सानपाडा येथील प्रकल्पात होते. महानगरपालिकेतून निवृत्त झाल्यानंतर गजानन दामले व अन्य काही समाजसेवी कार्यकर्त्यांनी कांजूरमार्ग येथे १९८३ साली 'वात्सल्य ट्रस्ट' या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.

 

एका खोलीमध्ये सुरू झालेल्या या संस्थेचा गेल्या ३० वर्षांत लक्षणीय विकास झाला. संस्थेची सानपाडा, कांजूरमार्ग, अलिबाग व बदलापूर येथे केंद्र आहेत. कांजूरमार्ग व सानपाडा येथील संस्थेच्या इमारती पूर्णपणे जनसहभागातून बांधण्यात आल्या आहेत. संस्थेद्वारा सुमारे १२०० अनाथ मुलांना स्वतःचे पालक मिळाले आहेत.

 

अर्भकालय प्रकल्प, महिला सबलीकरण, ई-लर्निंग, वृद्धाश्रम, बालिकाश्रम, रूग्ण साहाय्यक प्रशिक्षण वर्ग, फिजिओथेरपी आणि स्पीच थेरपी पुरविणारा 'आकार' विभाग, वैद्यकीय मदत केंद्र(प्रस्तावित) अशा विविध क्षेत्रांत वात्सल्य ट्रस्ट ही संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या या प्रवासात गजानन दामले ऊर्फ दामले काका यांचे योगदान अनन्यसाधारण आहे.

@@AUTHORINFO_V1@@