पुढचे दलाई लामा कोण होणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2019   
Total Views |



पंचेन लामांप्रमाणे दलाई लामांवरही चीन अत्याचार करेल, असे वातावरण तिबेटमध्ये तयार झाले. चीनचे षड्यंत्र जगासमोर मांडण्यासाठी १९५९मध्ये दलाई लामांनी भारतामध्ये राजाश्रय घेतला. आज जवळजवळ सहा दशकं ते भारतात आहेत.


आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याबद्दल बोलताना अमेरिकेचे राजदूत सेम ब्रॉऊनबॅक यांनी नुकतेच एक विधान केले. ते म्हणाले की, "पुढचे दलाई लामा हे चीन सरकारतर्फे नियुक्त केलेले नसावेत, तर ती निवड तिबेटमधील बौद्ध धर्माचे अनुयायी करतील." या गोष्टीसाठी वैश्विक समर्थन मिळावे म्हणून अमेरिका प्रयत्न करणार आहे. अमेरिकेच्या राजदूताने दलाई लामांच्या निवडीबद्दल असे विधान करणे याला जागतिक स्तरावर अनेक कंगोरे आहेत. चीन तिबेट, नेपाळ आणि भारत या चार देशांच्या इतिहासाचे एक आवरण या विधानाला आहे. एकोणिसाव्या शतकापर्यंत दक्षिण नेपाळ आणि तिबेटची तर युद्धे ठरलेलीच. नेपाळला शह देण्यासाठी तिबेटने चीनला मदतीला घेतले. नेपाळच्या जाचापासून तिबेटची सुटका झाली, पण चिन्यांनी नेहमीप्रमाणे तिबेटवर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली. १९१२ साली तिबेटने स्वत:ला ‘स्वतंत्र’ घोषित केले. १९३३ मध्ये सध्याचे दलाई लामा म्हणजे ज्ञानाचे सागर असलेले तेन्झिन ग्यात्सो यांची नियुक्ती झाली. ते तिबेटचे राष्ट्राध्यक्षही झाले. चीनने कुरापती काढून १९५५पासून तिबेटवर आक्रमण करण्यास आणि हक्क सांगण्यास सुरुवात केली. दलाई लामांनी नियुक्त केलेल्या पंचेन लामांचे पद चीन सरकारने १९९५ साली बरखास्त केले. त्यांच्या जागी त्यावेळी सहा वर्षांच्या बेनकेन एरदिनी या बालकाला बसवले. त्यानंतर पंचेन लामा कुठेही दिसले नाहीत. अशातच चीनने जबरदस्तीने ताबा मिळवलेल्या तिबेटवर कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली.

 

पंचेन लामांप्रमाणे दलाई लामांवरही चीन अत्याचार करेल, असे वातावरण तिबेटमध्ये तयार झाले. चीनचे षड्यंत्र जगासमोर मांडण्यासाठी १९५९मध्ये दलाई लामांनी भारतामध्ये राजाश्रय घेतला. आज जवळजवळ सहा दशकं ते भारतात आहेत. तिबेटच्या जनतेसाठी आणि तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी ते जगभर जागृती करत आहेत. चीनची दडपशाही त्यामुळे जगाच्या चव्हाट्यावर आली. हा इतिहास सांगायचा यासाठी की, चीनला दलाई लामा कायमच बंडखोर शत्रू वाटतात. पण, दलाई लामांवर थेट कारवाई केली तर धर्माच्या नावावर तिबेट आणि चीनमध्येही बंडाळी माजणार. त्यामुळे दलाई लामांचे धार्मिक वर्चस्व कमी करण्यासाठी चीन काही ना काही कुरघोड्या करत असतो. जसे तेराव्या शतकापासून पुढचा दलाई लामा कोण असेल, याबाबतचे काही संकेत वर्तमानकाळातील दलाई लामा देतात. त्यानुसार दलाई लामा मृत पावलेल्या दिवसापासून पुढे नऊ महिन्यांनंतर तिबेटच्या आजूबाजूच्या परिसरात जे बालक जन्माला येईल, ज्या बालकामध्ये मृत दलाई लामांनी सांगितलेले संकेत असतील, त्या बालकाला दलाई लामा म्हणून घोषित केले जाते. त्या बालकाला दलाई लामाच्या योग्यतेचे सर्वच शिक्षण दिले जाते. सध्याच्या चौदाव्या दलाई लामांनी सूचित केले होते की, पुढचा दलाई लामा हा भारतातील असेलफ झाले, भविष्यकाळातील दलाई लामा हे भारतातील असतील, तर जागतिक स्तरावर बौद्ध धर्मगुरूपद भारतातलेच असेल, यात शंका नाही.

 

तसेही, बौद्ध धर्माचे जन्मस्थान म्हणून भारताला अग्रक्रम आहेच, म्हणूनच की काय भूतानची राणी मां आशी दोर्जी वांगमो वांगचुक यांनी म्हटले आहे की, "बौद्ध धर्म ही भारताची भूतानला सर्वश्रेष्ठ भेट आहे." तिबेट आणि आता भूताननेही भारताला बौद्ध धर्माचे गुरूपद दिले, यामुळेच चीनचे धाबे दणाणले. चीनने जाहीर केले की, पुढचे दलाई लामा हे सध्याचे दलाई लामा एकटेच ठरवणार नाहीत, तर चीन प्रशासनही ठरवणार की, पुढचे दलाई लामा कोण असतील. अर्थात, चीन पुढचे दलाई लामा हे चीनमधलेच असतील, याची कटाक्षाने काळजी घेईल. बौद्धधर्मीय देशांचे धर्मगुरूपद चीनला मिळू नये म्हणून अमेरिकेनेही भूमिका घेतली की, पुढचे दलाई लामा हे तिबेटची जनताच ठरवेल. अमेरिका असे म्हणाली नाही की, पुढचा दलाई लामा हे तिबेटी धर्मसंकेतांनुसार सध्याचे दलाई लामाच ठरवतील. याचाच अर्थ अमेरिकेला भारतामध्येही बौद्ध धर्मगुरूपद येऊ नये, असेच वाटते. मात्र, काहीही असले तरी तिबेटच्या धार्मिक भावनेनुसार ग्यात्सो हे चौदावे दलाई लामा आहेत, तसेच ते तथागत गौतम बुद्धांचे ७४वे अवतार आहेत. त्यामुळेच सहा दशके दलाई लामा तिबेट भूमीपासून दूर असले तरी ते तिबेटसाठी आजही राष्ट्राध्यक्ष आणि जागतिक स्तरावरचे धर्मगुरूच आहेत. चीन किंवा अमेरिका काहीही म्हणो, तिबेटी जनता दलाई लामा काय म्हणतात, तेच ऐकणार हे निश्चित!

@@AUTHORINFO_V1@@