राज ठाकरेंकडून लता मंगेशकरांच्या तब्येतीची विचारपूस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2019
Total Views |



भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सोमवारी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ब्रीच कॅंडी रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत आधीच्या तुलनेत बरीच सुधारणा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी ट्विटरच्या माध्यमातून, ‘दीदी तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार’, अशी भावनिक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी आज पत्नीसह ब्रीच कॅंडी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.



लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
, अशी बातमी कानावर पडताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कळताच चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरेंसमवेत ब्रीच कॅंडी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारणा केली आहे. गुरुवारी राज ठाकरे यांनी एक पोस्ट केली होती. दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचे बळ इतके मोठे आहे की, या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतो, अशा आशयाचे ट्विट राज ठाकरे यांनी केले होते.

@@AUTHORINFO_V1@@