एटीएममधील पैसे संपण्याच्या समस्येवर उपाय - पेनियरबायतर्फे मायक्रो एटीएम्स लाँच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2019
Total Views |




मुंबई : आर्थिक सेवांपासून वंचित असलेल्या नागरिकांसाठी आर्थिक सेवांची नवी समीकरणे प्रस्थापित करण्याचे ध्येय भारतातील आघाडीचे हायपरलोकल फिनटेक नेटवर्क पेनियरबायने ठेवले आहे. या मिशनचा एक भाग म्हणून कंपनीने मायक्रोएटीएम्सचे स्वतःचे जाळे उभारत आपल्या सेवांमध्ये महत्त्वाची भर घातली आहे. नवी सेवा कंपनीच्या देशभरातील रिटेल टचपॉइंट्ससाठी लाँच केली जाणार आहे. कंपनीने या उपक्रमासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेशी करार केला आहे. मायक्रो एटीएम बिझनेस टर्मिनलसह पेनियरबायने पैसे काढण्याशी संबंधित आपल्या सेवा बळकट केल्या आहेत. आता आधारच्या सहाय्याने पैसे काढता येण्याच्या सेवेबरोबरच पेनियरबाय रिटेलर्सना डेबिट कार्डाद्वारे रोख पैसे काढता येऊ शकतात. यामुळे छोट्या किराणा दुकानांना एटीएम सेवेसारख्या सर्व प्रकारच्या सेवा देणारे ग्राहक सेवा केंद्र बनणे शक्य होईल.

 

ग्राहकांना त्यांच्या देशातील 16,722 पिन कोड्सपैकी त्यांच्या जवळच्या पेनियरबाय दुकानामध्ये (उदा. किराणा किंवा मोबाइल रिचार्ज दुकान) जाऊन आपले डेबिट कार्ड स्वाइप करून आणि पिन देऊन पैसे काढता येतील. जर त्यांच्याकडे डेबिट कार्ड नसेल, तर त्यांना आपला आधार क्रमांक आणि बोटांचा ठसा पैसे काढण्यासाठी वापरता येऊ शकतो. व्यवहार पूर्ण झाल्यावर ग्राहकाला त्यांच्या बँकेकडून खात्री करून घेणारा एसएमएस रिटेलरद्वारे मिळेल तसेच रिटेलरकडून पावतीही दिली जाईल. रोख पैसे काढण्याखेरीज ग्राहकांना या रिटेल केंद्रांमध्ये शिल्लक रकमेची चौकशीही करता येईल.
 

कमी खर्चिक आणि आटोपशीर असलेली ही मशिन्स सफाईदारपणे कार्डाचे व्यवहार पूर्ण करत असल्यामुळे पेनियरबायचे मायक्रो एटीएम दैनंदिन पातळीवर पैशांची मोठी आवक हाताळणारी रिटेल दुकाने आणि व्यापाऱ्यांसाठी प्रभावी तसेच वाजवी आहेत. या नव्या सेवेमुळे पेनियरबायच्या नेटवर्कवरील रिटेलर्सना त्यांच्या कप्प्यात ठेवले जाणारे पैसे अधिक चांगल्या प्रकारे वापरता येतील.

 

कंपनीने देशभरातील आपल्या 7,50,000 रिटेल टच पॉइंट्सच्या रिटेल नेटवर्कद्वारे ही सेवा सक्रिय करत देशभरात मायक्रो एटीएम्स उपलब्ध करायला सुरुवात केली आहे. कंपनीने लाँचच्या पहिल्या वर्षात एक लाख पीओएस अनेबल्ड मायक्रो एटीएम्स समाविष्ट करण्याचे ध्येय ठेवले आहे. लाँचविषयी पेनियरबायचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद कुमार बजाज म्हणाले, या मायक्रो एटीएम्सची पोर्टेबिलीटी, वाजवीपणा आणि देखभालीचा कमी खर्च लक्षात घेता ते आर्थिक सर्वसमावेशकतेसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतातच, शिवाय पायाभूत सुविधांवर होणारा खर्च, विशेषतः ग्रामीण भागात सर्व सुविधांनिशी एटीएम उभारण्याचा खर्च टाळला जाऊ शकतो.

 

पेनियरबाय नेटवर्कची व्याप्ती लक्षात घेता या मायक्रो एटीएम्सच्या लाँचमुळे आम्हाला रोख पैशांचे डिजिटायझेशन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी आणि बँकिंगपासून वंचित असलेल्यांना आर्थिक सेवा देण्यात मदत होईल. यामुळे आमच्या रिटेल भागिदारांनाही जास्त उत्पन्न मिळवता येईल. ग्रामीण भारताशिवाय आमची मायक्रो एटीएम्स बहुतांश एटीएम्स आधारशी लिंक केलेली नसतात किंवा बोटांच्या ठशांनी प्रवेश मिळत नाही, अशा शहरी भागांसाठी आदर्श आहेत. त्याहीपुढे जात ही एटीएम्स देशाच्या कानाकोपऱ्यातील राज्यांत उदा. आसाम आणि ईशान्येकडे, जिथे आधार क्रमांकाची व्याप्ती किंवा तो मिळवण्याचे प्रमाण अद्याप खूप कमी असल्यामुळे त्याची परिणीती एईपीएस योजनांच्या अभावात होत आहे, तिथेही उपयुक्त पडू शकतात.

 

कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (सीएटीएमआय) सॉफ्टवेयर आणि उपकरण अद्यावत करण्याच् तसेच त्याची देखभाल करण्याच्या अवाजवी खर्चामुळे सुमारे 50 टक्के एटीएम्स बंद करण्याचे जाहीर केले आहे. पेनियरबायद्वारे रिटेलर्सना डिजिटल आर्थिक/बिगर- आर्थिक सेवा आपल्या मर्चंट पॉइंट्सना पुरवून त्यांना सक्षम करत नजीकच्या भविष्त 50 लाख रिटेलर्सपर्यंत पोहोचण्याचे ध्येय ठेवले आहे. कंपनी सध्या आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम (एईपीएस) क्षेत्रात 33 टक्के हिश्श्यासह आघाडीवर आहे.

 

एप्रिल 2016 मध्ये स्थापन झालेली नियरबाय टेक्नॉलॉजीज ही कमी बँकिंग सेवा दिल्या जाणाऱ्या तसेच बँकिंगपासून वंचित असलेल्यांना आर्थिक/बिगर- आर्थिक सेवा देणारी फिनटेक कंपनी आहे. नियरबाय टेक्नॉलॉजीज बीटुबीबीटुसी मॉडेलवर आपल्या विविध ब्रँड्सच्या माध्यमातून काम करत असून त्यात पेनियरबाय, इन्शुअरनियरबाय, बायनियरबाय आणि इतरांचा समावेश आहे. पेनियरबायद्वारे रिटेलर्सना स्थानिक समाजाला डिजिटल सेवा देण्यासाठी व पर्यायाने भारतात आर्थिक सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी सक्षम केले जाते. रिटेलर सेवा आधारवर आधारित बँकिंग सेवा, देशांतर्गत पैसे पाठवणे, बिल पेमेंट्स, कार्ड पेमेंट्स आणि विमा सेवा यांवर लक्ष केंद्रित करतात.

 

कंपनीची स्थापना आनंद कुमार बजाज, सुभाष कुमार, यशवंत लोढा आणि राजेश झा यांनी केली असून त्यांना बँकिंग, पेमेंट्स आणि आर्थिक क्षेत्राचा दीर्घ अनुभव आहे. डीआयपीपी- प्रमाणित फिनटेक स्टार्टअपने विविध आर्थिक संस्थांशी भागिदारी केली असून त्यात येस बँक, आरबीएल बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अक्सिस बँक, सीसी अव्हेन्यू, बिल डेस्क, एनपीसीआय, फास्टॅग, एनबीएफसी आणि एफएमसीजी कंपन्यांचा समावेश आहे. येस बँकेला आधार एनेबल्ड पेमेंट्स सर्व्हिसेस (एईपीएस) आणि आयएमपीएस पुरवणारी ही एकमेव कंपनी असून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (एनपीसीआय) होस्ट केल्या जाणाऱ्या दोन कंपन्यांपैकी एक आहे. 

@@AUTHORINFO_V1@@