मयांकचे द्विशतक ; भारताची मोठी आघाडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2019
Total Views |



इंदोर : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी सलामीवीर मयांक अग्रवालने दमदार शतक झळकावले. पहिला दिवस भारताच्या गोलंदाजांनी दिवस गाजवल्यानंतर दुसरा दिवस मात्र मयंकच्या नावावर राहिला. त्याने एकाकी झुंज देत भारताला मजबूत स्थितीत आणले. त्याने पुजारा आणि राहाणेची चांगली साथ लाभल्याने भारताला मोठी आघाडी घेण्यात यश आले.

 

भारताने दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत ३ बाद १८८ धावा केल्या होत्या. इंदूरच्या होळकर मैदानात रंगलेल्या या सामन्यामध्ये अग्रवालने उपहारानंतर आपले शतक साजरे केले. तर पुढे ३०३ चेंडूंमध्ये त्याने कारकिर्दीतला दुसरे द्विशतक साजरे केले. गुरुवारच्या १ बाद ८६ धावांवरून पुढे खेळताना शुक्रवारी भारताने चेतेश्वर पुजाराला लवकर गमावले. संघाच्या १०५ धावा झाल्या असताना गोलंदाज अबू जैदने त्याला ५४ धावांवर बाद केले. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार लगावले. तसेच कर्णधार विराट कोहलीदेखील शून्यावर बाद झाला.

 

त्यापूर्वी, बांगलादेश संघाचा कर्णधार मोमीनूल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण मोमीनूलच्या हा निर्णय बांगलादेशच्या अंगउलट आला. भारतीय गोलंदाजीसमोर बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १५० धावांत आटोपला. उपहारापर्यंत बांगलादेशची अवस्था ३ बाद ६३ अशी झाली होती. अश्विनने त्यात चौथा धक्का देत बांगलादेशची अवस्था ४ बाद ९९ अशी केली. यानंतर लागलेली गळती थांबलीच नाही. बांगलादेशचा संपूर्ण संघ ५८.३ षटकात १५० धावांवर आटोपला.

@@AUTHORINFO_V1@@