जेएनयूमध्ये स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याची विटंबना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2019
Total Views |




नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. गेल्या १५ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. बुधवारी काही मागण्या मान्य करत प्रशासनाने शुल्कवाढीचा निर्णय मागे घेतला. मात्र आंदोलना दरम्यान स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाची विटंबना केली असल्याचे उघड झाले. त्याचप्रमाणे स्मारकाच्या बाजूला भाजपविरोधात अपशब्द लिहण्यात आले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार कोणी केला आहे यासंबंधी पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

 

मागील काही दिवसांमध्ये जेएनयूच्या घेतलेल्या काही निर्णयांविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलने केली होती. यावर त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या. जेएनयूने हॉस्टेलच्या नियमात बदल केले होते यासोबतच शुल्कवाढ, विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयांना टाळे लावल्याविरोधात विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आली होती. यानंतर जेएनयूच्या विद्यार्थी कार्यकारी समितीने फी वाढीचा निर्णय मागे घेतला असल्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर विवेकानंदांच्या पुतळ्यावर भाजपविरोधात आक्षेपार्ह विधाने लिहून त्याची विटंबना केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@