बांग्लादेशची सुरुवात डळमळीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2019
Total Views |


भारत आणि बांग्लादेश दरम्यानच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून इंदौरच्या होळकर क्रिकेट मैदानावर सुरुवात झाली आहे. आज सुरु झालेल्या या दोन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्याला आज सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. त्यानंतर बांग्लादेशने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. सध्या बांगलादेश ३ बाद ६३ धावांवर आहे.

दरम्यान भारत पुन्हा एकदा जागतिक टेस्ट क्रिकेट मालिकांच्या मानांकनात अग्रस्थानी येण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करेल अशी आशा सर्व चाहत्यांना आहे. कारण याआधी झालेली तीन टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका भारताने दोन - एक अशी जिंकली आहे. तर दुसरीकडे बांग्लादेशचा मोमिनुल हक संघाचा कर्णधार म्हणून या मालिकेत पदार्पण करत आहे. त्यामुळे त्याचे योगदान या मालिकेसाठी खूपच महत्वाचे ठरेल.

टॉस झाल्यानंतर भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली याने मालिकेच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ जास्त मजेदार असेल असा अंदाज वर्तवला असून या मालिकेत भारत आजच्या पहिल्या दिवशी फलंदाजीमध्ये भारताच्या तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह बांग्लादेशचे जास्तीत जास्त खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न करेल असे म्हटले.

@@AUTHORINFO_V1@@