श्रमयोगी स्वयंसेवक दत्तोपंत ठेंगडी

    14-Nov-2019
Total Views |



संघात आपल्या ध्येयाबद्दलची बांधिलकी, समर्पितता, विश्वसनीयता यांना जास्त महत्त्व दिले जाते. अभ्यास, अनुसंधान, वैचारिक अधिष्ठान त्याप्रमाणे संघटनेची रचना बांधणी करून कामगार क्षेत्रात राष्ट्रानुकूल परिवर्तन घडवून आणणारे द्रष्टे श्रमयोगी म्हणून दत्तोपंत ठेंगडी सर्वार्थाने द्रष्टे श्रमयोगी आणि सदा श्रद्धेय आहेत.

कामगार क्षेत्रात कम्युनिस्ट आणि समाजवादी विचारसरणीचा पूर्ण प्रभाव किंबहुना वर्चस्व असताना राष्ट्रवादी विचारसरणीचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन यशस्वी अथक आजीवन वाटचाल करणारा वारकरी म्हणजे दत्तोपंत ठेंगडी! कामगार क्षेत्रात केवळ रोजीरोटीचा विचार करता कामगारांनी राष्ट्राच्या पुनर्निर्माणातही सहभागी व्हावे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजी यांच्या प्रेरणेने संघाचे प्रचारक असलेले दत्तोपंत ठेंगडी यांनी 1975 सालीभारतीय मजदूर संघाची स्थापना केली. भा. . संघाचे नेतृत्व करीत असताना दत्तोपंत ठेंगडी यांना आपण संघाचे स्वयंसेवक आहोत याचा कधीच विसर पडला नाही किंवा किंबहुना त्यांनी पडू दिला नाही. भा. . संघाचे काम हे रा. स्व. संघाच्या राष्ट्रउभारणीच्या हिंदुराष्ट्राला परमवैभवाप्रत नेण्याच्या कामाचा मनोमन भाग आहे, ही त्यांची धारणा होती. त्यामुळेच त्यांचा नित्य संघ शाखेचा नेम कधीच चुकला नाही.

दत्तोपंतांनी देशाचे आर्थिक कामगार, शिक्षणविषयक धोरण त्याची अंमलबजावणी याबाबत विचार, अभ्यासपूर्ण आणि मूलभूत चिंतन केले होते. त्यातील विचार संघ, भा. . संघाच्या विविध बैठका कार्यक्रम परिसंवाद . मध्ये कार्यकर्त्यांसमोर मांडत, त्यांना मार्गदर्शन करीत असत. संघटन कार्यकर्ता या विषयावर तर ते अनेक दृष्टांत, उदाहरणे, प्राचीन, अर्वाचीन संदर्भ आपल्या भाषणात देत असत. कार्यकर्त्याचा व्यवहार, भाषा मापदंड कसा असावा, याबद्दल वेळोवेळी त्यांनी जे मौलिक विचार मांडले आहेत, ते दीपस्तंभाप्रमाणेच आहेत.

त्यातील काही उद्बोधक मुद्दे पुढीलप्रमाणे - कार्यकर्ता कंदिलाच्या काचेप्रमाणे : आपला कार्यकर्ता हाच आपल्या कार्याचा आधार आहे. आपले कार्य कार्यकर्त्यांमुळेच वाढणार आहे किंवा घटणार आहे. हेच आपले साधन आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्या ध्येयसंकल्पाचे दर्शन समाज करू शकतो. परमेश्वराचे दर्शन जर भक्ताच्या माध्यमातून होणार असेल तर तो भक्त कशा प्रकारचा असला पाहिजे? त्यासाठी कंदिलाच्या काचेचे उदाहरण योग्य आहे. दीपज्योत वादळातही जळत राहावी, यासाठी कंदिलाला काच असते. ती काच लावल्यामुळे वार्याचा झोत आला तरी ज्योत विझत नाही. आपल्याला चांगला प्रकाशही मिळतो. या काचेतून आपण ज्योतीलादेखील पाहू शकतो. परंतु, या काचेवर जर धूळ जमा झाली तर प्रकाश पूर्णपणे चांगल्याप्रकारे बाहेर येऊ शकणार नाही, तसेच आपण ज्योतीलाही पाहू शकणार नाही. काचेवर जर एखादा रंग लावला, तर ज्योतीचा जो खरा प्रकाश आहे, तो बाहेर येऊ शकणार नाही, तसेच ज्योतदेखील तिच्या स्वतःच्या रूपात आपल्याला पाहता येणार नाही. जर आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून कार्याचा प्रभाव समाजात पसरणार आहे आणि त्याच्या माध्यमातूनच आपल्या ध्येयसंकल्पाचे दर्शन समाजाला होणार आहे, तर कार्यकर्ता कंदिलाच्या काचेप्रमाणे निष्कलंक पारदर्शी असला पाहिजे. स्वतःच्या व्यक्तित्वाच्या दुसऱ्या कोणत्याच रंगाचा परिणाम आपल्या कार्यावर दिसता कामा नये.

कार्यकर्त्याचा मापदंड : जर कार्यकर्त्यासाठी आपल्याला एखादा मापदंड निश्चित करावयाचा असेल तर तो आहे त्याची विश्वसनीयता. भलेही एखाद्या व्यक्तीची क्षमता (Ability), कार्यतत्परता (Efficiency) कुशलता (Expertise) चांगली असेल, पण जर त्याच्याकडे आपल्या कार्याबद्दलची नि:स्वार्थ बांधिलकी (Commitment) नसेल, तर त्याला आपण कार्यकर्ता मानणार नाही. क्षमता, कार्यतत्परता कुशलता एका बाजूला विश्वसनीयता अर्थात सैद्धांतिक निष्ठा-बांधिलकी दुसऱ्या बाजूला. यामध्ये जर निवड करायची असेल तर कमी क्षमता, कमी गुणवत्ता असलेला परंतु, कार्यसमर्पित नि:स्वार्थ बांधिलकी आणि विश्वसनीयता असलेल्या कार्यकर्त्याची निवड करू. असमर्पित कर्तृत्ववान व्यक्तीपेक्षा आत्मसमर्पित कमी कर्तृत्ववान व्यक्ती आपल्या कार्याच्या दृष्टीने आपण सुयोग्य मानतो. सार्वजनिक क्षेत्रात तर व्यावसायिकता (Professionalism) आणि तत्त्वनिष्ठा (Conviction) यात नेहमी संघर्ष आढळून येतो. परंतु, संघात आपल्या ध्येयाबद्दलची बांधिलकी, समर्पितता, विश्वसनीयता यांना जास्त महत्त्व दिले जाते. अभ्यास, अनुसंधान, वैचारिक अधिष्ठान त्याप्रमाणे संघटनेची रचना बांधणी करून कामगार क्षेत्रात राष्ट्रानुकूल परिवर्तन घडवून आणणारे द्रष्टे श्रमयोगी म्हणून दत्तोपंत ठेंगडी सर्वार्थाने द्रष्टे श्रमयोगी आणि सदा श्रद्धेय आहेत!!

-आनंद कचोळे

९८६०५१५४७९


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.