बँकेतील ग्राहकांचा पैसा वाचण्यासाठी 'डिपॉझिट इन्शुरन्स कव्हर'ची व्याप्ती वाढवा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2019
Total Views |


 


वडोदरा : बँक तोट्यात गेल्यानंतरही ग्राहकांचा पैसा सुरक्षित राहावा, यासाठी ठेवींवरील विमा मर्यादेची व्याप्ती वाढविण्यात यावी, अशी मागणी 'सहकार भारती'ने केली आहे. गुजरातमधील वडोदरा येथे नुकत्याच पार पडलेल्या संस्थेच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आलातीन दिवस सुरू असलेल्या या बैठकीत विविध आर्थिक क्षेत्राशी निगडित विविध मुद्द्यांवर मंथन करण्यात आले. यात आर्थिक डबघाईला आल्यामुळे बँका तोट्यात जाणे, ग्राहकांचे पैसे बुडणे आदी प्रमुख विषयांवर उपाययोजना करण्यासाठी आर्थिक जगतातील तज्ज्ञांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी पंजाब-महाराष्ट्र को. ऑप. बँकेच्या (पीएमसी) ठेवीदारांचा मुद्दा अग्रस्थानी होता.

 

कर्जबुडव्यांमुळे बँका अडचणीत येण्याचे प्रमाण सध्या वाढीस लागले असून अनेक बँका आर्थिक डबघाईला आल्या आहेत. यामुळे बँका तोट्यात जाऊन ग्राहकांचे पैसे बुडत आहेत. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी ठेवींवरील विमा मर्यादा वाढवणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने ठेव विमा मर्यादा व्याप्ती पाचपट वाढवून बँकांतील ठेवी सुरक्षित कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत सहकार भारतीचे संस्थापक आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालकीय मंडळातील सदस्य सतीश मराठे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले आहे.

@@AUTHORINFO_V1@@