आयसीसीच्या नामांकनात विराट आणि बुमराह अव्वल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2019
Total Views |


आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने नमूद केलेल्या एकदिवसीय मानांकनात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली तसेच जसप्रित बुमराह यांनी आपापले अग्रस्थान कायम राखले आहे. फलंदाजांमधे कोहली आठशे पंच्च्याण्णव गुणांसह प्रथम क्रमांकावर असून, रोहित शर्मा आठशे चौतीस गुणांसह दुस-या क्रमांकावर आहे.

गोलंदाजीत बुमराह सातशे सत्त्याण्णव गुणांसह अग्रस्थानी असून, न्यूझीलंडचा ट्रेन्ट बोल्ट सातशे चाळीस गुणांसह दुस-या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या पहिल्या १० मध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. तो दहाव्या क्रमांकावर आहे. विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंडच्या खेळाडूंमधील नायक बेन स्टोक्स पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी याने स्थान पटकावले आहे.

@@AUTHORINFO_V1@@