मुंबई इंडियन्सच्या ताफ्याला 'बोल्ट'ची धार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2019
Total Views |



मुंबई : आयपीएल २०२०चे वारे वाहू लागले असतानाच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात ट्रेंट बोल्ट या वादळाचा संघात समावेश करण्यात आला आहे. आयपीएलचा हंगाम सुरु होत असताना काही संघांनी आपल्या खेळा़डूंची अदलाबदल केली. यामध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यामध्ये वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचा समावेश करण्यात आला आहे. जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश होतो. बोल्टने २०१४ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. २०१८ व २०१९ मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले. यात त्याने ३३ सामन्यांत ३८ विकेट्स घेतल्या आहेत.

 
 
 

काही दिवसांपूर्वी भारताचा आघाडीचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. पंजाबने या खेळाडूबद्दल दिल्लीकडे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टची मागणी केली होती. मात्र, दिल्लीने या महत्वाच्या खेळाडूला संघाबाहेर पाठवण्यास नकार दिला. आता ट्रेंट बोल्टला दिल्लीने 'बाय-बाय' केले आहे. १९ डिसेंबरला कोलकाता येथे आयपीएलच्या आगामी हंगामासाठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. तत्पूर्वी, संघांनी आपल्या खेळा़डूंची अदलाबदल केली आहे. राजस्थान रॉयल्सनेही अंकित राजपूतला किंग्स इलेव्हन पंजाबकडून आपल्या संघात घेतले आहे. राजपूतने २०१८ च्या हंगामात २३ सामन्यांत २२ विकेट्स घेतल्या आहेत.

@@AUTHORINFO_V1@@