बहुचर्चित ‘पानिपत’ चित्रपटाचं ‘मर्द मराठा’ गाणं रिलीज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2019
Total Views |



बहुचर्चित ‘पानिपत’ या चित्रपटाचं पाहिलं वहिलं गाणं आज रिलीज करण्यात आलं आहे. अर्जुन कपूर आणि क्रिती सॅनोनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं ‘मर्द मराठा’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या या गाण्याला मराठीतले सुप्रसिद्ध संगीतकर अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलं आहे. मराठ्यांची वीरता सांगणाऱ्या या गाण्यात अर्जुन कपूरसह क्रिती सॅनोन, पद्मिनी कोल्हापुरे, विकास बहल, गश्मीर महाजनी, रवींद्र महाजनी, मिलिंद गुणाजी, साहिल सलाठीया, अर्चना निपाणकरही दिसले आहेत.

 


मराठा साम्राज्याची ऐतिहासिक लढाई म्हणजे पानिपतचे तिसरे युध्द. या युद्धात अफगाणिस्तानचा राजा अहमद शाहा अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला.
पानिपतची लढाई ही मराठा इतिहासातील सर्वात जास्त चर्चिली गेलेली आणि लक्षात ठेवली गेलेली लढाई आहे. पानिपतचे तिसरे युद्ध होऊन आता अडीचशे वर्षे उलटली असली तरी अजूनही पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पानिपतचे युध्द मराठे हरले असले, तरी त्यांनी ज्या प्रकारे अब्दालीचा प्रतिकार केला त्यातून धडा घेऊन अब्दाली किंवा वायव्येकडील एकही आक्रमक त्यानंतर भारतावर हल्ला करू शकला नाही.

याच युद्धावर आधारित ‘पानिपत’ हा चित्रपट असून, आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात अर्जुन कपूर ‘सदाशिवराव भाऊ’, क्रिती सॅनोन ‘पार्वतीबाई’, तर संजय दत्त ‘अहमद शाहा अब्दाली’ ही भूमिका सकारात आहे.

@@AUTHORINFO_V1@@