'आदित्य ठाकरे बनणार मुख्यमंत्री'चे फलक उतरवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2019
Total Views |



मुंबई : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा आणि राष्ट्रपती लागवट चालू झाल्यानंतर सर्वच चित्र बदलले आहे. मुंबई महानगरपालिकेने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' बंगल्याबाहेरून फलक हटवण्यात आली. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवा अशा मागणीचे हे फलक होते.

 

महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यानंतर निवडणूक लढवणारी ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती म्हणून आदित्य ठाकरेंना वरळी विधानसभेची जागा देण्यात आली. या जागेवर आदित्य ठाकरेंनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनतर शिवसैनिकांकडून त्यांना मुख्यमंत्री बनवा अशी मागणी जोर धरू लागली. याचवेळी २६ ऑक्टोबरला निकाल लागल्यानंतर मातोश्री बाहेर या मागणीचे फलकदेखील लावण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@