पाऊले पुन्हा एकदा रंगभूमीकडे !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2019
Total Views |


 

प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर २५ वर्षांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. कुसूरया हिंदी नाटकामधून ते पुनरागमन करणार आहेत. हे नाटक संध्या गोखले यांनी लिहिले असून, नाटकाच्या दिग्दर्शनाची बाजूही अमोल पालेकारांसह त्यांनी संभाळली आहे.

या नाटकांत ते निवृत्त एसीपी धिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. खुर्चीला खिळवून ठे‌वणारा आणि प्रयोग संपल्यानंतरही मनात रेंगाळणारा असा या नाटकाचा विषय असल्याचे अमोल पालेकरांनी या नाटकाबद्दल सांगतले. येत्या २४ तारखेला अमोल पालेकर पंच्याहत्तरीमध्ये प्रवेश करत आहेत आणि त्याच दिवशी या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग असल्याने या प्रयोगाविषयी ते अधिक उत्सु आहे. नाटक करताना शारीरिक आणि मानसिक कसोटी लागत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

नाटकाची कथा एका डॅनिश फिल्मवरून प्रेरित असून, मुंबईसारख्या आधुनिक शहरात याची कथा घडते. २४ तारखेला मुंबईच्या एनसीपीएमध्ये या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

अमोल पालेकर यांनी १९७१ मध्ये मराठी चित्रपटापासून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांच्या 'रजनीगंधा'ने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.

'प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेवर माझा विश्वास असल्याने मी त्यांना कधीच उपदेशाचे डोस पाजले नाही. मी त्यांच्याबाबत कायम प्रामाणिक राहिलो. स्त्री नेहमीच माझ्या चित्रपटांचा केंद्रबिंदू राहिली आहे. मी तिला कधीच अजागळ वगैरे दाखवले नाही. त्याच तळमळीने मी आज प्रेक्षकांना विनंती करू इच्छितो की तुम्ही अधिक सुज्ञ व्हा. विविध विचारधारांमुळे येणारी मतभिनत्ता, निर्भय संवाद या बाजूंचा स्वीकार करा. एखाद्या मुद्द्याला सखोल विश्लेषणाशिवाय विरोध करू नका,' अशी विनंतीही अमोल पालेकर यांनी केली.

@@AUTHORINFO_V1@@