राज्यपालांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2019
Total Views |
 
 
 मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी  केंद्रीय गृह मंत्रालयाला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी दिलेली मुदत अजून संपलेली नाही. मात्र, दुपारी १२ वाजता राष्ट्रवादीने राजभवनात पत्र पाठवून सत्तास्थापनेकरिता वेळ मागितली. त्यामुळे राज्यपालांनी वेळ वाढवून न देता राष्ट्रवादीला दिलेली  मुदत संपण्यापूर्वीच राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातील पत्र केंद्राकडे पाठविले आहे.  
 
 
 

 
 
 
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण,  राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातील शिफारशीचे पत्र केंद्राकडे पाठविले आहे. राज्यपालांनी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी  मुदत दिली आहे. मात्र, दुपारी १२ वाजता राष्ट्रवादीने सत्तास्थापनेसाठी वेळ वाढवून मागणारे पत्र राज्यपालांना पाठविले. राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार देऊन केंद्राकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. दरम्यान राज्यपालांच्या या निर्णयाला शिवसेना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि आमदार अनिल परब यांनी दिली आहे. राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापन करण्यासाठी वेळ वाढवून दिला नाही, असा आक्षेप शिवसेनेने घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून कपिल सिब्बल न्यायालयात त्यांची बाजू मांडणार आहेत. 
 
 
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  ब्रीक्स परिषदेकरिता ब्राझीलला रवाना होण्यापूर्वी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीबाबत चर्चा पार पडली नाही. उलटपक्षी राज्याच्या सुरक्षेसंदर्भात मोदी यांनी आढावा घेतल्याची माहिती मिळत आहे. 
@@AUTHORINFO_V1@@