शरद पवार राऊतांच्या भेटीला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2019
Total Views |



मुंबई (प्रतिनिधी) -कालच्या सत्ता गदारोळानंतर आज सकाळी शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीसाठी लीलावती रूग्णालयात पोहोचले. शरद पवार यांची संजय राऊत यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी देखील लीलावती रूग्णालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली.
 
संजय राऊत यांच्या छातीत दुखत असल्याने काल त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांनी ट्वीट केलं आहे, 'लहरो से डरकर नौका पार नही होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती.'
राज्यपालांनी भाजप, शिवसेना सत्ता स्थापनेस अयशस्वी ठरल्याने काल राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिले. आज रात्री साडेआठपर्यंत सत्तास्थापन करण्याची वेळ राष्ट्रवादीला राज्यपालांनी दिली आहे. काँग्रेसनेते दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी म्हटलं आहे, शिवसेनेशिवाय सत्तास्थापन करणं कुणालाही शक्य नाही. जर राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही, तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता नाराज शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
@@AUTHORINFO_V1@@