'भाजप'चे नेते संजय राऊतांच्या भेटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2019
Total Views |


 

मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील सत्तासमीकरण शीगेला पोहोचलेले असताना लिलावती रुग्णालयात उपचाराकरिता दाखल असणारे शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या भेटीला भाजपचे नेते जात आहेत. भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य आणि आमदार आशिष शेलार आणि हर्षवर्धन पाटील यांनी राऊतांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीगाठींमुळे भाजप-सेनेमधील बंद झालेली चर्चेची दारे पुन्हा एकदा उघडी होतात का, हे पाहावे लागेल. दरम्यान 'संजय राऊत यांनी कमी बोलावे, त्यामुळे त्यांची प्रकृती नीट राहिले', असे शेलार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

 
 
 

राज्याच्या सत्तेची घडी बसता बसत नसल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. काल शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करण्यामध्ये अयशस्वी ठरली. आता सत्तास्थापनेचा हा चेंडू राज्यपालांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅग्रेस आघाडीच्या पारड्यात टाकला आहे. यावर रात्री ८.३० वाजता निर्णय घेणे अपेक्षित आहे. सत्तास्थापनेतील या गोंधळात काल दुपारी संजय राऊत यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल व्हावे लागवे. छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावे लागत आहे. त्यांच्या रक्त नलिकांमध्ये दोन ब्लाॅक आढळले असून अॅंजिओप्लास्टी करण्यात येणार आहे. दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. या सगळ्यात भाजप नेत्यांनी आज सकाळी संजय राऊत यांची भेट घेतली.

 
 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकाळीच राऊंतांची भेट घेतल्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य आणि आमदार आशिष शेलार रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी राऊतांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. प्रसंगी उद्धव ठाकरे आणि शेलारांची भेट घडू शकली नाही. त्यापूर्वी शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याबरोबर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी देखीव राऊतांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीसंदर्भात विचारणा केली.

@@AUTHORINFO_V1@@