सेवाधाम प्रतिष्ठान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2019   
Total Views |


 


हृदयाची शुद्धि; अहंभावनेचा विनाश; सर्वत्र ईश्वरत्व ची अनुभूति तसेच शांति भावनेची प्राप्ति. म्हणजे सेवा होय. असे पुज्य गोळवलकर गुरूजी म्हणाले होते. या लक्षणांनीयुक्त सेवा पाहायला मिळणे दुर्लभ आहे. मात्र माळेगाव पुण्याची सेवाधाम प्रतिष्ठाण संस्था मात्र याच सेवाभावावर काम करते. डॉ. बीव्ही राव, एस वार्डेकर, डॉ. एस व्ही गोरे, डॉ. के.व्ही वाढोकर यांनी १५ ऑगस्ट १९७८ साली या संस्थेची स्थापना केली. संस्था आरोग्य आणि शिक्षणाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करून संस्था महाराष्ट्रात वेगवगेगळ्या स्तरावर कार्यरत आहे.


नानासाहेब गोरे आणि कृष्णकांत वाढोकर या दोन मित्रांनी साधारण ४५ वर्षांपूर्वी तळेगाव, माळेगावमधील वनवासी पाड्यांवर काम करण्यास सुरवात केली. दोघेही डॉक्टर. दवाखान्यामध्ये रूग्णांना तपासताना त्यांना असे आढळून आले की या परिसरातून जवळच असलेल्या वनवासी पाड्यांवर अनेक समस्या आहेत. त्यापैकी आरोग्याची समस्या महत्वाची. कोणताही आजार झाला तर वैद्यकिय उपचार करण्यापेक्षा बुवाभगतांकडे जाऊन नवससायास करणे, त्यांने सांगितलेले कर्मकांड करणे हेच उपचार वनवासी करत. यामध्ये रूग्ण आजारापासून मुक्त होण्याएवजी त्याचे आरोग्य आणखिनच बिघडे. नानासाहेब आणि कृष्णकांत २५शीचे तरूण. हे सगळे विदारक दृष्य अनुभवून त्यांचे मन हेलावले. आपल्या वनवासी बांधवाच्या आरोग्यासाठी आपण काम करायलाच हवे असे या दोघांनी ठरवले. त्यासाठी सर्वप्रथम त्यांनी काय केले तर दवाखान्यात येणाऱ्या रूग्णांचे ते उपचार करायचेच. पण, माळेगाव, तळेगावच्या परिसरातील वनवासी पाड्यांमधिल गरीब गरजू आणि खऱ्या अर्थाने वंचित असलेल्या वनवासी बांधवाना आरोग्य सेवा पोहचज नव्हत्या, त्यांच्यापर्यंत हे दोघेजण पोहचत. अर्थात पाड्यातल्या अंधश्रद्धा आणि अविश्वास पहिल्यांदा त्यांचे स्वागत करत. कारण कोण हे दोघे? यांना काय करायचे आहे आपल्याशी? आणि भगताने सांगितलेले तोडगे सोडून यांचे उपचार का करायचे? नानासाहेब आणि कृष्णकांत यांना याबदद्ल शंका निरसन करावे लागे.

 

या परिसरामध्ये आरोग्य सेवा करताना त्यांना इथे दोनतीन कुष्ठरोगीही भेटले. त्यांची अवस्था तर अत्यंत दयनिय. जनावरांपेक्षाही वाईट वागणूक त्यांना मिळे. छोटे छोटे आजारही इथे अज्ञानामुळे मृत्यूपंथाला नेत तर या कुष्ठरोगांच्या स्थितीबद्दल न बोललेच बरे. नानासाहेब आणि कृष्णकांत या दोघांनी विचार केला की आपण इथे कितीही मोफत आरोग्यसेवा पुरवल्या तरी जोपर्यंत इथल्या लोकांमध्ये अज्ञान आहे तोपर्यंत इथल्या समस्या संपणार नाहीत. त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. तेच इथे नव्हते. शिकून काय करायचे आहे ही इथली मानसिकता. तसेच दुर्गम वनवासी पाड्यांमध्ये शाळेच्या सुविधांचा अभावच. त्यामुळे सेवा कार्यासाठी एक संस्था स्थापन करावी, त्यातून वनवासी समाजाच्या विविध समस्यांच्या निर्मुलनासाठी काम करावे असे या दोघांनी ठरवले. त्यातूनच सेवाधाम संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे वाडेश्वर आणि तळेगाव इस्पिताळ आहे आहे.वरळे येथे नर्सिंग प्रशिक्षण केंद्र आहे. तसेच परिसरामध्ये ४० बालवाड्या आहेत. संस्थेच्या कामाचा झपाटा विलक्षण. ३००० कुष्ठरोग्यांवर उपचार आणि त्याद्वारे ३००० कुष्ठरोगींना कुष्ठरोग मुक्त केले आहे. अर्थात कुष्ठरोग्यांवर काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. मग यात सेवाधामचे वेगळेपण काय? तर या सेवाधामचे वेगळेपण हेच की कुष्ठरोगावर काम करणाऱ्या इतर संस्था कुष्ठरोग्यांसाठी वसतीआश्रम चालवतात. तीथे कुष्ठरोगी राहतात. तीथेच त्यांच्यावर उपचार होतात. बरे झाल्यावरही कुष्ठरोगी तीथेच राहतात अपवादात्मक स्थितीत घरी परतात. पण यापार्श्वभूमीवर सेवाधामचे वैशिष्ट्ये हेच की सेवाधाम संस्था कुष्ठरोग झालेल्या रूग्णांचा उपचार त्यांच्या घरी जाऊन करतात. जोपर्यंत तो रूग्ण पुर्णता बरा होत नाही तोपर्यंत त्याला आरोग्याच्या, सक्षम मानसिकतेच्या आधाराच्या सुविधा देतात. आपल्याला माहिती आहे की एखाद्याला कुष्ठरोग झाला की त्याला घराबाहेर काढण्याची मानसिकता असते. पण संस्था या कुषठरोग्यांच्या घरातल्यांचेही यशस्वी समुपदेशन करते. त्यामुळेच कुष्ठरोग घरापासून समाजापासून न दुरावता आजारावर सउपचार घेऊ शकतो.

 

 
 

संस्थेच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारतर्फे संस्थेला नोडल एजिन्सीम्हणून प्रमाणित केले आहे. बाल आरोग्य, तसेच एडस जनजागृती कार्यक्रमामध्ये संस्था महाराष्ट्र सरकारची नोडल एजन्सी म्हणून काम करते. महाराष्ट्रातील २५०० माध्यमिक शाळेतील शिक्षकांना संस्थेने एडसवर प्रशिक्षण दिले आहे. एडस, कुष्ठरोग, क्षयरोग यासारख्या आजारांबद्दल लोकांच्या मनात भयंकर भिती आहे. या आजारांबद्दल समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम संस्था करते. आरोग्याच्या क्षेत्रात संस्थेचे भरीव काम आहे. महाराष्ट्रभर आरोग्यविषयक जनजागृती, मार्गदर्शनपर काम करतानाच संस्था माळेगावच्या परिसरामध्ये वनवासी बांधवांच्या आरोग्यावर तनमनधन अर्पून काम करतेसंस्थेच्या या परिसरामध्ये ४० बालवाडया आहेत. वनवासी समाजामध्ये बालकांच्या आरोग्याच्या समस्या उग्रच म्हणायला हव्यात. बहुधा बालकांना जगवने हे देवबाप्पाच्या हातात,असेच इथले पालकांची वृत्ती. त्यामुळे रानातल्या पाखरासारखी मुलं जगतात, वाढतात. कुपोषणाना राक्षस इथे टपून बसलेला. त्यामुळे संस्थेने बालकांसाठी काम करण्याच्या उद्देशान इथे बालवाड्या स्थापन केल्या. बालक आले, त्या निमित्ताने त्यांचे पालक आले. त्यानिमित्ताने पाड्याचे जिवनमान स्पष्ट झाले. संस्थेला इथे असेही दृश्य दिसले की बालक कितीही आजारी असले तरी पालक त्यांना पाड्याच्या बाहेर देवाखान्यात नेऊनच देत नसत. त्यांचे म्हणणे की आजारी पोराला पाड्याबाहेर नेला तर देवाचा कोप होईल. पाड्याबाहेर त्याचे रक्षण कोण करेल?त्यामुळे मुलगा आजाराने अंथरूणात तळमळत पडला तरी पालक हातावर हात ठेऊन नशिबावर त्याला ठेवत. पण बालवाडीमध्ये मुल येऊ लागली आणि त्या बालकांचे आणि पालकांची मत पालटवण्याची संधी संस्थेला प्राप्त झाली. कित्येक दशके आदिवासी बांधवासाठी काम करणाऱ्या या संस्थेच्या संस्थापक नानासाहेब गोरेंना आदिवासी सेवक पुरस्कार मिळावा यात काही आश्चर्य नाही. संस्था पर्यांवरणासाठीही काम करते. जागतिक बँकेच्या साहाय्याने महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शनाने संस्थेने सामजिक वनिकरणाचे उद्दिष्ट ठरवले आहे त्यानुसार1 लाख झाडे संस्था लावत आहे. तसेच संस्थेचा सेतू नावाचा उपक्रम आहे. यामध्ये परिसराची स्वच्छता आणि प्लास्टिकचा पुर्नवापर याबाबत संस्था काम करते. परिसरातील वनवासी बांधवाना मृदा संवर्धनाचे महत्व पटवणे आणि मार्गदर्शन करणे तसेच मोकळया जागेत भारतीय वृक्षांचे रोपण करणे हे देखिल काम संस्था करते. या सगळया कामामध्ये पाड्यातील महिलांचा सहभाग असायलाच हवा यासाठी संस्थेचा कटाक्ष. तसेच लोकांनी वाचनाची आवड जोपासावी म्हणून संस्थेचे वाचनालयही आहे.

 

असो, संस्थेचे आरोग्यासोबतच शैक्षणिक कार्यही असेच मन दिपवून टाकणारे. वनवासी समाजाचे आरोग्यमान सुधारण्यासाठी त्यांना शिक्षित करायला हवे यासाठी सेवाधाम संस्थेने माळेगाव येथे शाळा सुरू केली. १९९४ साली सुरू केलेल्या या शाळेत कातकरी,फोसपारधी, महादेव कोळी आणि ठाकर समाजाचे ४४२ विद्यार्थी शिकतात. त्यापैकी २२४ मुल आणि २१८ मुली आहेत. या आश्रमशाळेला महाराष्ट्र सरकारचा उत्तम आश्रमशाळा हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कारण या शाळेचा दहावीचा निकाल हा दवर्षी ९० ते १०० टक्केच लागतो. विद्यार्थ्यांनी नुसते पुस्तकी ज्ञान आत्मसात न करता आयुष्यात त्यांनी खऱ्या अर्थाने यशस्वी व्हावे यासाठी शाळा पुर्ण लक्ष देते. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम संस्था करते. त्यांना आधुनिक जगाचे ज्ञान मिळावे ओळख व्हावी यासाठी अनेक स्पर्धा, कार्यक्रम शाळा राबवते. शाळेतील माध्यमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांना लष्करी शिक्षणही दिले जाते. इतकेच काय माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाते. त्यामध्ये इलेट्रॉनिक्स, गृहउद्योग, शेतकी, वेल्डिंग वगैरे अनेक अभ्यासक्रम आहेत. प्रत्येक विद्यार्थी हे अभ्यासक्रम शिकतात. इथल्या विद्यार्थीनीही उत्कृष्ठ वेल्डिंग, फिटरचे काम करतात यातच सगळे आले. इथै विद्यार्थी भाजीपाला पिकवतात. तो बाजारात विकतात आणि त्या पैशाचे पुन्हा नविन बियाणे आणि खत आणतात. गृहविभागात विद्यार्थी विविध खाद्यपदार्थ बनवायला शिकतात. तेही पुर्ण व्यावसायिक कौशल्याने. म्हणजे अमुक एक पदार्थासाठी इतक्या प्रमाणात अन्नघटक समाविष्ट करायचे, त्यासाठी त्यांचा बाजारमुल्य काय आहे, कुठून स्वस्तात मिळतील? त्यांची विक्री केल्यावर नफा किती मिळेल वगैरे गोष्टीही इथे शिकवल्या जातात. प्रत्येकाला आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सक्षम संधी मिळणे हे संस्थेचे ध्येय आहे. तसेच समाजातील अत्यंज घटकांनाही मानवी मुल्यांवर आधारीत शाश्वत आणि सक्षम जिवन जगता यावे हेच संस्थेचे उद्दिष्ट आहे. स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणाले होते की बंधुभावाने केलेल्या सेवेपेक्षा आत्मभावाने केलेली सेवा ही श्रेष्ठ आहे. अशी आत्मभावाने प्रेरित असलेली अमुल्य सेवा सेवाधसम प्रतिष्ठाण करत आहे.

 

(संपर्क : प्रमिला भालके - 7620083924)

@@AUTHORINFO_V1@@