पाठिंबा पत्रावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2019
Total Views |


 

मुंबई (प्रतिनिधी) - शिवसेनेला पाठींबा देण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. शिवसेनेला सत्तास्थापनेकरिता आवश्यक असणाऱ्या पांठिब्याच्या पत्रावरून या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पाठिंब्याचे पत्र देण्यास उशीर झाल्याचे खापर राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील नेते एकमेकांचा माथी फोडत आहेत.


काल सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर पोहोचलेल्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पाठिंब्याचे पत्र मिळण्याची आशा होती. मात्र, तसे न झाल्याने सेनेची सत्तास्थापनेची संधी हुकली. आता पाठिंबा पत्र देण्यास उशीर झाल्याचे जबाबदारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर ढकलत आहेत. काँग्रेस नेत्यांनी 'शिवसेनेसोबत सत्तेत जावे शक्य नसल्यास किमान बाहेरून तरी पाठिंबा द्यावा', असे त्यांना सांगितल्यानंतरही शिवसेनेकडे वेळेवर पाठिंब्याचे पत्र पाठविले गेले नाही. त्यामुळे राज्यात आता राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता असल्याचेही बोलले जाते. यावर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना फोन करुन नाराजी देखील व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे. शरद पवारांनी काँग्रेस नेते अहमद पटेल यांना फोन करून दोन दिवसांची मुदत मागितल्याचा दावा काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंनी केला आहे. मात्र असा कुठलाही फोन राष्ट्रवादीकडून गेला नसल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही आपण माणिकराव ठाकरेंना नव्हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीना ओळखतो असा टोला लगावला आहे. पण अजित पवार यांनी याचं खापर काँग्रेसवर फोडलं आहे. काँग्रेसने पत्र द्यायला उशीर केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 
 

काँग्रेसच्या या आडमुठेपणामुळे शरद पवार अत्यंत नाराज झाले असले तरी केंद्राच्या दादागिरीसमोर झुकण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसमधील बहुतांश आमदार अत्यंत नाराज असून हे आमदार मुंबईत परतल्यानंतर काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे. सोमवारी दिवसभरात काँग्रेसच्या अनेक आमदारांनी शरद पवार अजित पवार यांच्याशी फोनवरून चर्चा करून 'काहीही करून सोनियाजींना समजवा', असे सांगितल्याचे कळते. मात्र, 'सोनिया यांना जे सांगायचे ते आपण सांगितले आहे, यापलिकडे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे', असे पवार यांनी त्यांना सांगितल्याचे कळते.


@@AUTHORINFO_V1@@