पाठिंबा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंची पवारांकडे धाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019
Total Views |



मुंबई (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असा अधिकृत प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना दिला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे व त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांच्या भेटीसाठी धाव घेतली. वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्ये ही बैठक सुरू होती. या बैठकीसाठी अजित पवारही उपस्थित होते. काँग्रेसचा निर्णय झाल्यानंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करू, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्यामुळे उद्धव ठाकरे पवारांच्या भेटीला गेल्याचे समजते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनी सेनेला पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली आहे. शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला तसा अधिकृत प्रस्तावही देण्यात आला आहे. सत्तास्थापनेसाठी शिवसेनेकडे काहीच तास शिल्लक असल्यामुळे आता कोण काय भूमिका घेईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची बैठक सुरू असून दुसरीकडे शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांच्यातही चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केल्यानंतर अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत राजीनामा दिल्याचे सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@