शिवसेनेला पांठिबा देण्यासंदर्भात काँग्रेसचा विचार ऐकणार - राष्ट्रवादी काॅंग्रेस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019
Total Views |



मुंबई (प्रतिनिधी) - विधानसभेची निवडणूक आघाडीने लढल्याने, पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठीचा निर्णय हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रतीतरित्या परस्पर सहमतीनेच घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. शिवसेनेसोबत आघाडी करण्यासंदर्भात काॅेंग्रसेने आपले मत मांडल्यानंतरच दुपारी ४.३० नंतर निर्णय घेणार असल्याने नवाब यांनी स्पष्ट केले. 

 
 

महाराष्ट्राच्या सत्तासमीकरणासाठी नवीन जुळवाजुळव सुरू झाली आहे. शिवसेना राष्ट्रवादी काॅेंग्रस आणि काॅेंग्रससोबत हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात आज सकाळी राष्ट्रवादी काॅेंग्रसची एक बैठक पार पडली. तर दिल्लीत काॅेंग्रस कमिटीची बैठक झाली. या बैठकीअंती शिवसेनेला पांठिबा देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. शिवसेनेला पाठिंबा हवा असल्यास आधी त्यांना केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बैठकीनंतर सांगितले. तसेच आम्ही आघाडीत लढलो असल्याने काॅेंग्रसच्य़ा निर्णयाची वाट पाहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केली. या दरम्यान सायंकाळी ४ वाजता काॅेंग्रसमधील उचपदस्थ नेते महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ४.३० वाजता राष्ट्रवादी काॅेंग्रस आपला शिवसेनेला पांठिबा देण्यासंदर्भातला निर्णय जाहीर करणार आहे. दरम्यान शिवसेनेचे केंदीय मंत्री अरविंद सावंत यांनी 'शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का राहायचे?, असे ट्विट करत आपण केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या सत्तेच्या या गदारोळात आता दिल्लीमध्ये काय निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

@@AUTHORINFO_V1@@