'महाराष्ट्र पक्षीमित्र'चे पुरस्कार जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019
Total Views |


 
 

रेवदांड्यातील 'महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलना'त पुरस्कार प्रदान सोहळा

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणाऱ्या “महाराष्ट्र पक्षिमित्र” या संस्थेतर्फे प्रथमच देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पहिला पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार बाळासाहेब कृ. कुलकर्णी, पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार मुकुंद धुर्वे आणि संशोधन - जनजागृती पुरस्कार डॉ प्रशांत वाघ व श्री. अश्विन पाटील यांना जाहीर झाला आहे. ११ व १२ जानेवारी, २०२० रोजी रेवदांडा येथे पार पडणाऱ्या 'महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलना'त हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

 

 
 
 

पक्षी निरीक्षण, संवर्धन आणि अभ्यासाची चळवळ जागृत ठेवण्यासाठी दरवर्षी 'महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलना'चे आयोजन करण्यात येते. या संमेलनामध्ये यावर्षी काही पुरस्कार प्रदान करण्याचा निर्धार 'महाराष्ट्र पक्षीमित्र' संघटनेने केला आहे. यावर्षीचा स्व. रमेश लाडखेडकर पक्षीमित्र 'जीवन गौरव पुरस्कार' दीर्घकाळ पक्षीमित्र चळवळीत राहून पक्षी संवर्धन व जनजागृती कार्यरत असलेले बाळासाहेब कृ. कुलकर्णी, पुणे यांना घोषित करण्यात आला आहे. रु. ५०००/- रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून या वर्षी हा पुरस्कार विदर्भ पक्षिमित्र मंचद्वारे डॉ. अनिल पिंपळापुरे यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे.

 

दुसरा पुरस्कार स्व. डॉ. जी. एन. वानखेडे स्मृती पक्षीमित्र पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार हा पक्षीमित्र चळवळीतील पक्षी संवर्धन, अधिवास संवर्धन तथा जखमी पक्षी उपचार आदी क्षेत्रात कार्यरत पक्षीमित्र मुकुंद धुर्वे, गोंदिया यांना जाहीर करण्यात आला आहे. तिसरा पुरस्कार पक्षीमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास, संशोधन आणि जनजागृती आदी क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ प्रशांत वाघ, सिन्नर आणि अश्विन पाटील यांना विभागून देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार असून यावर्षी ३३ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन रेवदंडा जी. रायगड येथे दि, ११ व १२ जानेवारी २०२० दरम्यान होणार आहे. या पुरस्कारांचे वितरण या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली.

@@AUTHORINFO_V1@@