लता मंगेशकर रुग्णालयात दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019
Total Views |



मुंबई (प्रतिनिधी) - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना काल मध्यरात्री रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
 
लता मंगेशकर यांना काल मध्यरात्री श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत. 'सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचं काही कारण नाही,' असे उषा मंगेशकर यांनी सांगितले आहे. ब्रीच कँडी रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार डॉ. फारोख ई उदवडिया (Dr. Farokh E Udwadia) यांच्या मार्गदर्शनाखाली लतादीदींवर उपचार सुरू आहेत. काल मध्यरात्री त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. परंतु, आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून आज रात्री किंवा उद्यापर्यंत त्यांना घरी पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

@@AUTHORINFO_V1@@