सेनेच्या हालचालींवर 'भाजप'ची नजर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019
Total Views |



मुंबई (प्रतिनिधी) - भाजप सत्ता स्थापनेचा दावा करण्यात असमर्थ ठरली असली, तरी सध्या सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. शरद पवार- उद्धव ठाकरे भेट, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या बैठकांनंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक 'वर्षा' बंगल्यावर सुरू झाली आहे.

सत्तास्थापनेसाठी पुरसे संख्याबळ नसल्याने भाजप सत्ता स्थापनेचा दावा करण्यात असमर्थ ठरली आहे. यानंतर शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देण्यात आले. सत्तास्थापनेच्या निर्णयासाठी आज संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंतची वेळही त्यांना दिली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठीच्या घडामोडींना आज सकाळपासून वेग आला आहे. केंद्रीय अवजड मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला. त्यामुळे शिवसेनेने 'एनडीए'तून अधिकृतरित्या बाहेर पडली आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी दुपारी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसच्या गोटात बैठकांना सुरुवात झाली आहे. मात्र, आता भाजपा-शिवसेनेची युती कायम राहते का, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. युतीबाबत संध्याकाळी साडेसातनंतर भाजपाची भुमिका स्पष्ट करु असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली असून या बैठकीसाठी चंद्रकांतदादा पाटीलांसह भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव उपस्थित आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@