सौरभ चौधरीची आशियाई स्पर्धेत रुपेरी कामगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019
Total Views |



नवी दिल्ली : डोहामध्ये सुरु आशियाई स्पर्धेमध्ये भारताच्या १७ वर्षीय सौरभ चौधरी या नेमबाजाने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये रौप्यपदक मिळवले. तसेच या प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माने पाचवे स्थान पटकावले. सौरभने अंतिम सामन्यामध्ये २४४.५ गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले.

 

उत्तर कोरियाच्या किम सॉन्ग गुकने २४६.५ गुणांसह सुवर्णपदक पटकवले. तसेच, इराणच्या फोर्ई जावेदने २२१.८ गुणांसह कांस्यपदक जिंकले. सध्या या स्पर्धेत भारताची कामगिरी ही लक्षणीय ठरली आहे. यापूर्वीदेखील अभिषेक वर्मा आणि सौरभ चौधरीने ऑलिम्पिकचे तिकिट मिळवले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@