शिवसेनेच्या डोकेदुखीत वाढ ; संजय राऊत रुग्णालयात दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019
Total Views |



मुंबई : गेले काही दिवस सत्तास्थापनेचे राजकारण रंगले असताना सोमवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. योग्य ते उपचार केल्यानंतर त्यांना सोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी दिली.

 

याच दरम्यान, संजय राऊत यांच्या अनुपस्थितीत एकनाथ शिंदे, अनिल परब, सुभाष देसाई, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर या तीन नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संजय राऊत यांनी गेल्या १५ दिवसांपासून शिवसेनेची बाजू लढवली आहे. शिवाय भेटीगाठींमध्येही तेच अग्रेसर होते. त्यामुळे आता त्यांची जबाबदारी आता या तीन नेत्यांवर पडली आहे.

@@AUTHORINFO_V1@@