शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019
Total Views |



मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'मधून (एनडीएमधून) बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यासाठीच्या हालचालींना वेग आला असून 'एनडीए'च्या माध्यमातून केंद्रीय मंत्रिमंडळात बसलेले शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत राजीनामा देणार आहे.

 
 

रविवारी भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी असर्मथता दर्शवली. महायुतीमध्ये असलेला शिवसेना पक्ष सोबत येत नसल्यामुळे आम्ही सरकार स्थापन करु शकत नाही, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच सेनेला जर राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस सोबत सरकार स्थापन करावण्यासंदर्भात शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राजकरणीय वातावरणात हालचालींना वेग आला. शिवसेनेने राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेस नेत्यांशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. तर त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्यासाठी 'एनएडीए'मधून बाहेर पडण्याची तयारी केली आहे.

 
 

केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेचे असलेले एकमेव मंत्री अरविंद सांवत आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यासाठीची तयारी त्यांनी सुरू केली असून पत्रकार परिषद घेऊन त्यासंदर्भात घोषणा करण्यात येणार आहे. सावंत केंद्रीय मंत्रिमंडळात अवजड उद्योग मंत्रालयाचे मंत्रिपद भूषवत आहेत. या सर्व हालचालींमुळे शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार असल्याचे जवळपास निश्चित्त झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सत्तासमीकरणांवर पडणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@