इथे शरमला अफझलखान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019
Total Views |


 


एकदा एक वाघ शेतकऱ्याच्या मुलीच्या प्रेमात पडतो. गुरकावतच शेतकऱ्याकडे जाऊन लग्नाची मागणी घालतो. शेतकरी म्हणतो, "बाबा तुझी नखं किती लांब, ती उपटून टाक म्हणजे ती तुझ्याजवळ येईल." वाघ धावत जाऊन नखं उपटून येतो.पुन्हा शेतकरी म्हणतो, "बाबा तुझे सुळे किती टोकदार...मुलगी घाबरेल माझी." वाघ धावत जाऊन सुळे पाडून येतो. सुळे पाडलेला, नखं झडलेला वाघ आपल्याबरोबर शेतकरी मजबूत दांडका घेतो आणि त्याला ठोकायला सुरुवात करतो.


एकदा एक वाघ शेतकऱ्याच्या मुलीच्या प्रेमात पडतो. गुरकावतच शेतकऱ्याकडे जाऊन लग्नाची मागणी घालतो. शेतकरी म्हणतो,"बाबा, तुझी नखं किती लांब, ती उपटून टाक म्हणजे ती तुझ्याजवळ येईल." वाघ धावत जाऊन नखं उपटून येतो. पुन्हा शेतकरी म्हणतो, "बाबा, तुझे सुळे किती टोकदार... मुलगी घाबरेल माझी!" वाघ धावत जाऊन सुळे पाडून येतो. सुळे पाडलेला, नख झडलेला वाघ आल्याबरोबर शेतकरी मजबूत दांडका घेतो आणि त्याला ठोकायला सुरुवात करतो. पुढे काय होते ते वेगळे सांगायला नको. पण, कालपासूनच्या सत्तेच्या नाटकात जे झाले ते यापेक्षा वेगळे नाही. शिवसेनेची अवस्था त्या वाघासारखीच झाली आहे. खंडोजी खोपडेंपासून ते जावळीच्या मोऱ्यांपर्यंत शिवकालातल्या सर्वच स्वराज्य शत्रूंची नावे घेऊन उद्धव ठाकरे, संजय राऊत ज्या गमजा मारीत होते, त्या सगळ्याच व्यक्तिमत्त्वांनी आश्चर्याने तोंडात बोटे घालावी किंवा शिवसेनेच्या कोलांटउडीसमोर आपली प्रतारणा काहीच नाही, असे मानून टकमक टोकावरून उडी मारून जीव द्यावा, अशा कारवाया शिवसेना अध्यक्ष आणि त्यांचे कारभारी संजय राऊत यांनी मांडल्या होत्या. त्याचा आज अंत झाला. 'नपुंसका'पासून ते 'मैद्याच्या पोत्या'पर्यंत सर्व प्रकारची विशेषणे लावलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचे काय परिणाम असू शकतात, याची थोडी तरी अक्कल शिवसेनेला आली असावी, असे मानायला हवे. अन्य सर्व प्रकारच्या सर्वच लोकांनी महायुतीत निवडणुका लढल्यानंतर या दोघांच्या डोक्यात मुख्यमंत्री होण्याचा जो काही कली शिरला, तो काही केल्या आवरायला तयार नव्हता. त्याचाही कंडू आता शमला असावा. आपला डाव खरा करण्यासाठी मग स्वर्गस्थ झालेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेल्या वचनाचा आधार घेण्यात आला. तो तसा घ्यायला हरकत नाही. स्वर्गीय बाळासाहेब आणि त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना काय वचने दिली असतील, ती अन्य कुणाला ठाऊक असल्याचे कारण नाही. पण, आता शिवसेनेची जी काही केविलवाणी अवस्था झाली आहे, ती पाहून निधड्या छातीच्या बाळासाहेबांना व तितक्याच तडफदार प्रबोधनकारांना काय वाटत असेल? किंबहुना, तसे वचन उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेच असेल, असे आपण मानू. मूळ मुद्दा येतो तो म्हणजे, बाळासाहेबांना दिलेल्या एवढ्या मोठ्या वचनाची उद्धव ठाकरेंना यापूर्वी आठवण का झाली नाही? भाजपबरोबर 'हो-नाही' करीत शिवसेनेने जागावाटप केले. नंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या एकमेकांबरोबर बैठका झाल्या. अशा कुठल्याही बैठकीत उद्धव ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित केला नाही. अशा बैठकांतील तपशील गुलदस्त्यात असतात, हे जरी मान्य केले, तरी उद्धव ठाकरेंच्या कुठल्याही जाहीर सभेत बाळासाहेबांना दिलेल्या या शब्दाचे स्मरण उद्धव ठाकरेंनी का केले नाही? वस्तुत: आतापर्यंत शिवसेनेने कमावलेल्या जागांपैकी हा सगळ्यात निचांक आहे. खुद्द ठाकरे कुटुंबीय निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर व आज शिवसेनेचे अध्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद पटकावण्याचे प्रयत्न करीत असताना या घसरलेल्या आकड्याची चर्चाच करू नये, हा मूर्खपणा म्हणायचा की चालबाजी?

 

या सगळ्या काळात संजय राऊतांनी सगळ्यांची मापे काढली. अशा स्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांच्या आसपास आपल्याला मिळालेल्या जागा थोड्याफार कमी आहेत, हे या मंडळींच्या ध्यानात येत नाही का? वस्तुत: महाराष्ट्राच्या निवडणुका लढल्या गेल्या, त्या महायुतीच्या माध्यमातून महायुतीचा निर्विवाद चेहरा देवेंद्र फडणवीसांचा होता. महायुतीतल्या घटकपक्षांनी मिळून ठरविलेला हा चेहरा होता. देवेंद्र फडणवीसांनी हा विश्वास स्वत:च्या वर्तनातून मिळविला होता. गेली पाच वर्षे सकारात्मक पद्धतीने वाटचाल करीत त्यांनी महायुतीला बहुमताच्या जवळ आणले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, ठाकरे घराण्याचा एक सदस्य असलेले आदित्य ठाकरे यावेळी आमदार होऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश करते झाले. आदित्यला निवडून आणण्याकरिता शिवसेनेने ज्या हातखंड्यांचा उपयोग करून घेतला, तो मुळी शिवसेनेच्या राजकारणाची झलक देणाराच होता. युती झाल्यामुळे आदित्य ठाकरेंसमोर भाजपचे आव्हान राहिले नाही. वरळीतील तमाम शिवसैनिकांनी गेली दहा वर्षे ज्या सचिन अहिरांशी उभा दावा मांडला होता, त्या सचिन अहिरांनाच शिवसेनेने पक्षात घेतले. घराणेवाल्या पक्षांची एक पद्धत असते. ते परस्परांची मुले विधानसभेत किंवा लोकसभेत शिताफीने पोहोचतील, अशी साटीलोटी लावतात. आदित्यच्या बाबतीतही तेच झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने तिथे एक तकलादू उमेदवार दिला. भाजपच्या वाट्याची 2014ची मतेही आदित्य ठाकरेंना मिळाली आणि ते विजयाचे वाटेकरी ठरले.

 

आता पुढे काय होईल, याचे भाकीत करणे आजच्या अग्रलेखात थोडे धाडसाचे ठरेल. भाजपला मिळालेला आकडा हा असा आहे की, शिवसेनेच्या किंवा अन्य कुठल्याही पक्षाच्या किमान ३०-३५ जागा जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत भाजप सत्तास्थापनेचा दावा करू शकत नाही. भाजपचे विशेष नाही. दोन पंतप्रधान, शेकडो केंद्रीय मंत्री, कितीतरी मुख्यमंत्री पाहिलेला हा पक्ष आहे. मूळ मुद्दा आहे, शिवसेनेच्या सतत आव आणून केलेल्या गर्जना आता केकाटल्यासारख्या वाटू लागल्या आहेत आणि बोहारणीसारखी त्यांची स्थिती झाली आहे. २०१४च्या निवडणुकीत दिल्लीहून 'अफझलखानाच्या फौजां'चा उल्लेख केला गेला होता. खरा अफजलखान किमान ज्याची इमानाने रोटी खात होत्या, त्यासाठी तरी लढला. शिवसेनेचे नेमके काय सुरू आहे, तेच कळत नाही. "शिवसेनेचा दावा कायम राहील आणि आम्ही सगळ्यांना घेऊन पुन्हा येऊ," हा आदित्य ठाकरेंचा दावा कमालच होता. देवेंद्र फडणवीसांचा द्वेष आणि सत्तेची लालसा यापलीकडे आज शिवसेनेेकडे काहीच नाही. २०१९ ला जे नरेंद्र मोदींच्या बाबतीत केले गेले, तेच आता देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत केले जात आहे. मोदींचे जे व्हायचे ते झाले, पण शिवसेेनेचे काय झाले ते समजून घ्यायची, 'हीच ती वेळ.'

@@AUTHORINFO_V1@@