राज्यात 'महाशिवआघाडी'चे सरकार ; टिकणार की पडणार ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019
Total Views |



 


 

मुंबई (प्रतिनिधी) - शिवसेना राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसचा पाठिंबा मिळवत सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. त्यामुळे राज्यात आता 'महाशिवआघाडी'चे सरकार स्थापन होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मात्र, नैतिक विचारसरणी मिळतीजुळती नसताना हे सरकार टिकणार की पडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 


महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसचे पाठबळ मिळवत शिवसेना सत्ता स्थापन करणार आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस शिवसेनेला थेट पाठिंबा देणार असल्याचे म्हटले जात आहे. तर काॅंग्रेस या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याच्या विचारात आहे. आदित्य ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना झाले असून, सेना सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची शक्यता आहे. सत्तास्थापनेसाठी सेनेकडे आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी झालेल्या बैठकीत सोनिया गांधींनी काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा केली. या बैठकीत पाठिंबा देण्याचे ठरले आहे असा दावा सेनेने केला आहे. मात्र काँग्रेस प्रत्यक्ष सत्ता स्थापनेत सहभागी होणार की सेनेला बाहेरून पाठिंबा देणार ही बाब अजूनही गुलदस्त्यातंच आहे. शिवसेनेला समर्थन देत असल्याचं पत्रं राष्ट्रवादीकडून राज्यपालांना देण्यात आलेलं आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@