ShivSenaCheatsMaharashtra म्हणत नेटकऱ्यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019
Total Views |




मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस हातमिळवणी करणार असल्याचे निश्चित झालेले असताना नेटकऱ्यांनी मात्र शिवसेनेला समाजमाध्यमांवर चांगलेच धारेवर धरले आहे. ज्यांच्या विरोधात मते मागितली त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याची नाच्चकी शिवसेनेवर आल्याचे म्हणत #ShivSenaCheatsMaharashtra हा हॅशटॅग व्टि्टरवर ट्रेन्डिंगमध्ये आहे.

 
 
 
 
 

रविवारी भाजपने राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी जनतेने मतांचा कौल महायुतीच्या पारड्यात टाकूनही शिवसेना सरकार स्थापन करण्याकरिता तयार होत नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर शिवसेनेचा गटात राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेससोबत हातमिळवणी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. मात्र, शिवसेनेच्या या भूमिकेला नेटकऱ्यांनी फारकत घेतली आहे. ज्या राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस विरोधात यंदाच्या निवडणूकीत तुम्ही मते मागितली आणि ती जनतेने तुम्हाला ती दिली, त्याच पक्षांना सोबत घेऊन तुम्ही सरकार स्थापन करत असल्याचे नेटकऱ्यांनी समाजमाध्यमांवर म्हटले आहे. यासाठी नेटकऱ्यांनी #ShivSenaCheatsMaharashtra या हॅशटॅगचा वापर केली आहे. हा हॅशटॅग वापरुन नेटकऱ्यांनी शिवसेनेच्या भूमिकेेवर ताशेरे ओढले असून हा हॅशटॅग व्टि्टरवर ट्रेन्डिंगवर आहे.

 
 
 
 

#ShivSenaCheatsMaharashtra या हॅशटॅग अंतर्गत बाळासाहेब ठाकरे काॅंग्रेसला पोपट बोलत असल्याचा व्हिडोओ व्हायलर होत आहे. तसेच आदित्य यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस विरोधात केलेल व्टि्ट आणि सामानमधील अग्रलेख, बातम्यादेखील व्हायरल होत आहेत.

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@