भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नाही : चंद्रकांतदादा पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2019
Total Views |




मुंबई 
राज्यात सत्ता स्थापनकरण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला निमंत्रण दिले होते. मात्र रविवारी पार पडलेल्या मॅरेथॉन बैठकांनंतर भाजपने सत्ता स्थापनेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर रविवारी पार पडलेल्या बैठकीनंतर भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटून आपण सत्ता स्थापन करणार नसल्याचे कळवले. या भेटींनंतर झालेल्या झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले कि, “आम्हाला जनादेशाचा अपमान करायचा नव्हता. त्यामुळे आम्ही राज्यपालांची भेट घेऊन भाजपा सरकार स्थापन करणार नसल्याचे सांगितले आहे."


यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले कि
, "जनतेने महायुतीला कौल दिला होता. त्यानुसार भाजप, शिवसेना व सर्व मित्रपक्षांनी एकत्रित सरकार स्थापन करावे असा महाजनादेश होता. शिवसेनेने मात्र या जनादेशाचा अनादर केला आहे. त्यामुळे जनतेचा अनादर करत जर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणार असतील तर त्यांना शुभेच्छा." यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यासोबत गिरीश महाजन, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हे नेतेही उपस्थित होते.

 
@@AUTHORINFO_V1@@