मंदी नव्हे संधी..... स्वयंरोजगाराची!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Nov-2019
Total Views |
 



आज सगळीकडे आर्थिक मंदीची भीती पसरत आहे. अशा वेळी घरातल्या गृहिणीच्या मनात आपणही घरखर्चाला आर्थिक हातभार लावावा अशी इच्छा येणं स्वाभाविक आहे. पण तेही घरातल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून उपलब्ध वेळात आणि कोणत्याही आर्थिक फसवणुकीची भीती नसल्या खात्रीशीर मार्गानेच साध्य व्हावं अशीही इच्छा असते. फक्त गृहिणीच नव्हे अन्य नोकरदार मंडळीदेखील अतिरिक्त उत्पन्नासाठी प्रयत्न करीत असतातच.



 

 

अशा सर्वांसाठीच एक खात्रीशीर पर्याय घेऊन आली आहे आपल्या सर्वांची विश्वासाची पितांबरी कंपनी. तो म्हणजे पितांबरी ग्राहक मंच. गेल्या तीस वर्षांच्या वाटचालीत पितांबरीची १२५ वेगेवेगळ्या पॅक मधली ५५ हून अधिक अभिनव उत्पादनं ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. संपूर्ण भारता सोबतच देशाबाहेरही पसरलेल्या पितांबरी व्यवसायानं २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

 

काय आहे पितांबरी ग्राहक मंच? पितांबरीची अभिनव आणि दर्जेदार उत्पादनं अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि त्यासाठी पितांबरीला साहाय्य्य करणाऱ्याला म्हणजेच प्रवर्तकाला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचं एक उत्तम, खात्रीशीर माध्यम! पितांबरीची जुनी आणि नवी उत्पादनं दर महिन्याला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची खात्रीलायक सोय यातून होते ?

 

कोण होऊ शकतं प्रवर्तक? १८ वर्षांवरील कोणीही व्यक्ती रु. १०००/- डिपॉझिट भरून पितांबरी ग्राहक मंचाची प्रवर्तक होऊ शकते. या प्रवर्तकाने आपल्या परिचितांपैकी किमान ५ व्यक्तींना सदस्य करून त्यांचा एक गट तयार करावा व त्यांना पितांबरी उत्पादनांची माहिती देऊन त्यांच्याकडून ऑर्डर घेऊन पितांबरी ऑफिसमध्ये पाठवावी.यासाठी लागणारं सर्व साहित्य म्हणजे दरपत्रक, हॅण्डबील इत्यादी पितांबरी कंपनीकडून उपलब्ध करून दिलं जाईल.

 

प्रवर्तकांमार्फत झालेल्या सदस्यांना पितांबरी उत्पादनांच्या MRP वर 10 % सवलत मिळेल. या ऑर्डरनुसार ५ दिवसांनंतर प्रत्येक सदस्याने पाठवलेला माल स्वतंत्र पॅकिंग करून प्रवर्तकाच्या पत्त्यावर पितांबरी कंपनीकडून कोणताही वाहतूक खर्च न घेता पाठविला जाईल. तिथून सदस्यांनी आपापल्या मागणीनुसार माल घेऊन जावा.

 

मग यात प्रवर्तकाचा काय फायदा? तर प्रवर्तकाला त्याच्या गटातल्या सदस्यांनी मागविलेल्या एकूण ओर्डेरच्या MRP वर १५% कमिशन मिळेल. पितांबरीची लोकप्रियता पाहता प्रवर्तक आपल्या कौशल्याने निश्चितच चांगलं उत्पन्न मिळवू शकतो. या संदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रश्न , शंका, यांच्या निवारणाकरिता सौ.शिवानी नेमावरकर यांच्याशी 022 – 67035509 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत अवश्य संपर्क साधावा.





 

@@AUTHORINFO_V1@@