'फत्तेशिकस्त' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2019
Total Views |



फर्जंदनंतर पुन्हा एकदा आपल्या कलाकृतीने प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर
'फत्तेशिकस्त' मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आज या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रदर्शित झाले असून उद्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.

आज प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चित्रपटातील महत्वाच्या भूमिका साकारणारे कलाकार झळकत आहेत. मुख्य भूमिका साकारणारा चिन्मय मांडलेकर, जिजाऊंची भूमिका साकारणाऱ्या मृणाल कुलकर्णी, अनुप सोनी, अंकित मोहन, मृण्मयी देशपांडे, निखिल राऊत आणि समीर धर्माधिकारी या सर्वांच्या भूमिकांची झलक या पोस्टरमध्ये दाखवण्यात आली आहे.

'फत्तेशिकस्त' या चित्रपटात मावळ्यांप्रमाणेच काही स्त्रियांनी देखील स्वराज्य बांधणीत अतिशय मोलाची कामगिरी केली त्याचे वर्णन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी, तृप्ती तोरडमल नक्षत्रा मेढेकर या सगळ्यांचे स्वराज्यातील योगदान या चित्रपटात पाहायला मिळेल. 'फत्तेशिकस्त' हा चित्रपट स्वराज्यातील पहिल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारीत आहे. येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@