भाजपला नाही तर; कुणाला पाठिंबा द्यायचा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2019
Total Views |



मुंबई :भाजपला पाठिंबा द्यायचा नाही तर मग कुणाला पाठिंबा द्यायचा? कलम 370 काढू नका म्हणणार्‍या काँग्रेसला पाठिंबा द्यायचा का? भाजप आणि शिवसेनेची युती महाराष्ट्राने स्वीकारली आहे. जागावाटपावर जे टीका करत आहेत, त्यांना माझे हे उत्तर आहे,” असे प्रतिपादन मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केले.

 

दादरमधील शिवाजी पार्क येथील मैदानावर उपस्थितांना संबोधित करताना उद्धव म्हणाले, “विशेष कायदा करा आणि राम मंदिर उभारा, ही शिवसेनेची मागणी आहे. आम्ही त्या मागणीवर आजही ठाम आहोत. आम्हाला मतं मागण्यासाठी राम मंदिर नको आहे. लोकभावनेचा विचार करून आम्ही ही मागणी करतो आहोत. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या निर्मितीचा निर्णय दिला तर ठीक, नाही तर विशेष कायदा करा आणि राम मंदिर उभारा, ही शिवसेनेची आग्रही मागणी आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

 

...ते तर मगरीचे अश्रू

अजित पवार यांच्या राजीनामा नाट्याचाही उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. अजित पवार यांच्या डोळ्यात अश्रू पाहून मला मगरीच्या डोळ्यातले अश्रू आठवले. अजित पवार हे म्हणतात, राजकारणाचा स्तर खालावला आहे, तुमच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्ही आता शेती करणार म्हणता आहात, पण पाणी लागलं आणि धरणावर जायची गरज पडली तर काय करणार? आता तुम्ही रडता आहात, मात्र माझा शेतकरी जेव्हा तुमच्याकडे मदत मागायला आला होता तेव्हा तुम्ही धरणाच्या पाण्याबाबत काय वक्तव्य केलं? ते आठवा,” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

@@AUTHORINFO_V1@@